ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राज्यभरात शाळा आजपासून सुरू:मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषद शाळांचे कौतुक; विदर्भातील शाळा मात्र 30 जूनपासून उघडणार, वाचा काय कारण?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महिनाभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचे मनोबल वाढवले. पनवेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिक्षकांचे कौतुक शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमधील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेला थेट भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील आधुनिक शिक्षणपद्धती आणि शिक्षकांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. “आज जिल्हा परिषदेतील शाळांचे शिक्षण हे ९० टक्के खाजगी शाळांपेक्षाही अधिक चांगल्या दर्जाचे झाले आहे,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आज जिल्हा परिषद शाळा ‘मॉडेल’ होत आहेत: सुनेत्रा पवार पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत बोलताना सुनेत्रा पवार यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “शाळेचा पहिला दिवस ही माझ्या जिव्हाळ्याची बाब आहे. पूर्वी शाळेच्या पहिल्या दिवशी रडारड व्हायची, पण आता परिस्थिती बदलली आहे. शाळा असो की शासकीय इमारत, ती दर्जेदारच असायला हवी, असा अजितदादांचा अट्टाहास असायचा. म्हणूनच आज जिल्हा परिषद शाळा ‘मॉडेल’ बनत असून, इथे अत्याधुनिक लॅबच्या माध्यमातून प्रात्याक्षिकांसह दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. आम्ही शाळेत जाताना रडायचो, आता मुलं हसत येतात: शिरसाट छत्रपती संभाजीनगरमधील सातारा जिल्हा परिषद शाळेतही ‘प्रवेश उत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. “आमच्या वेळी वेगळी परिस्थिती होती, आम्ही शाळेत जाताना रडायचो; पण आजची मुलं हसत हसत शाळेत येत आहेत. पालकांनी मुलांवर कोणतीही बंधनं न टाकता, त्यांना जे वाटतं ते करू दिलं पाहिजे,” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. हिंगोलीत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हाभरातील सुमारे एक हजार शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेऊन त्यांचे औक्षण करत स्वागत करण्यात आले. अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला. शाळा रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात आल्या होत्या आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसर आनंदाने फुलून गेला.
बीडमध्ये औक्षण करून भरवले गुलाब जामुन बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अतिशय अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण केले, त्यांच्या हातात फुले दिली आणि तोंड गोड करण्यासाठी त्यांना ‘गुलाब जामुन’ भरवले. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी खास ‘सेल्फी पॉईंट’ देखील तयार करण्यात आला होता, ज्यामुळे पहिल्याच दिवशी मुले भारावून गेली होती. विदर्भातील शाळा 15 ऐवजी 30 जूनपासून सुरू अमरावती जिल्ह्यातील सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू होतील. विदर्भातील सध्याचे उष्णतामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील वाढते उष्णतामान आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी यामुळे या भागातील शाळा उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे आली होती. या मागणीच्या अनुषंगाने काही शिक्षक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मोदींना रोखण्यासाठी देशात आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय: हर्षवर्धन सपकाळांचा दावा, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर