ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पुणे शहरात 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा:टंचाईमुळे कार वॉश, स्विमिंग पूलवर निर्बंध; महापालिकेचा निर्णय

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदाच्या मान्सूनमध्ये कमी पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त झाल्याने पुणे महापालिकेने शहरात 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून नागरिकांना वर्षभर पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर उपस्थित होत्या. खडकवासला धरणसाखळीत सध्या केवळ 5.03 टीएमसी पाणी शिल्लक आहे, त्यापैकी सुमारे 3 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली असून, अल-निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या शहरासाठी दररोज सुमारे 1600 एमएलडी पाणी उचलले जात असून, कपातीनंतर ते 1100 एमएलडीपर्यंत मर्यादित केले जाईल. फुरसुंगी, मांजरी, वाघोली, नांदोशी, नऱ्हे, आंबेगाव, केशवनगरचा काही भाग आणि कात्रज आदी भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. शिवाजीनगर व पेठ भागात मात्र मिश्र स्वरूपाची व्यवस्था राहील. महापालिकेने वाहन धुणे, स्विमिंग पूल भरणे, उद्यानांसाठी व बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर यावर बंदी घातली आहे. तसेच, एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) असलेल्या सोसायट्यांना पुनर्वापराचे पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या भागात पाणीपुरवठा होणार नाही, त्या दिवशी आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. नागरिकांना पाणीटंचाई जाणवू नये यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पाणीटंचाईच्या काळात टँकर व्यावसायिकांनी अडवणूक केल्यास किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असला तरी नियम सर्वांसाठी समान राहतील, असे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केले. नवीन वेळापत्रकाच्या अंमलबजावणीच्या पहिल्या आठवड्यात काही अडचणी येऊ शकतात, मात्र त्यासाठी उपअभियंते आणि विभागीय अधिकारी 24 तास उपलब्ध राहतील, असे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सांगितले. सोमवारपासून वॉशिंग सेंटर्स बंद करण्यात येतील आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची काळजी घ्यावी, घरगुती ‘ग्रे वॉटर’चा पुनर्वापर करावा आणि गळती आढळल्यास तत्काळ कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत नळजोडींवर कारवाई केली जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले. शहरात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा महापालिकेने व्यक्त केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर