ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

‘सीताराम कारखान्या’च्या गेटवर ठिय्या:प्रदूषणामुळे खर्डीकर हैराण, धुराड्यातून पडणारी राख अन् दूषित पाण्यामुळे पिके धोक्यात‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम शुगर्स या खासगी साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सोमवार पासून कारखान्याच्या प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन सुरु केलेले आहे. दरम्यान, कारखाना प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारपासून १० जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. खर्डी (ता. पंढरपूर) येथील सिताराम शुगर्स या कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणारी राख व बग्यास या उपद्रवामुळे परिसरातील अनेक स्थानिक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारखान्याने राखेच्या संदर्भात प्रदूषण मुक्तीची आणलेली मशीन बंद ठेवली असल्याने जवळपास ५ किलोमीटर परिसरात असणारी पिके तसेच घरांमधून राख पसरलेली दिसून येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या स्थानिक अबालवृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार जडले असल्याचे दिसून येत आहे. दूषित पाणी, दूषित हवा, राख आणि बगॅसची धूळ यामुळे या परिसरातील पिके संकटात आलेली आहे, अनेक शेतकऱ्यांनी जनावरे सुद्धा यामुळे दगावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कारखान्याने दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारल्याने अनेक विहिरींना व आजूबाजूच्या विंधन विहिरीला दूषित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जाऊ लागले असल्याची तक्रार आजूबाजूचे ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत कारखाना प्रशासनाशी अनेक वेळा वारंवार पत्र व्यवहार करून देखील तसेच लेखी निवेदन देऊन देखील कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी अनिल आगावणे, गजान न घाडगे, विष्णू सुळे, काशिलिंग सुळे, राजू पुंडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कारखान्याचे प्रदूषण चाचणी नियामक मंडळाने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. ^त्यांच्या मागण्या आहेत, त्यावर आम्ही त्यांना उत्तर दिलेले आहे. पोलीस डिपार्टमेंट येऊन गेले, त्यांनी कारखाना, प्रशासन आणि आंदोलकांना सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता कारखाना प्रशासन घेत आहे. इथून पुढेही आम्ही सुधारणा करू, त्यांच्या ज्या पण मागण्या आहेत, त्या कारखाना पहिल्यापासून सोडवत आलेला आहे आणि इथून पुढेही सोडवू. – सुयोग गायकवाड, कार्यकारी संचालक, सीताराम शुगर्स त्रास होणार नाही याची दक्षता कारखाना घेणार

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर