ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

कापूस पिकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील:राज्यस्तर राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘कापूस हे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख पीक असून, कापसाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि शेतकरी मार्गदर्शनातून उत्पादनवाढ साध्य केली जाईल,’ असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे. ते पुसदा येथे आयोजित कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा, राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. हा कार्यक्रम २२ मे रोजी पुसदा येथे झाला. या कार्यक्रमाला धनंजय धवड, पौर्णिमा सवाई, डॉ. दिलीप काळे, अविनाश पांडे, प्रशांत गुल्हाने, अभय महल्ले, काशिनाथ फुटाणे, प्रशांत डहाणे, भय्यासाहेब निचळ, अरुण शिंदे, हर्षल ठाकूर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला कापूस उत्पादक शेतकरी कार्यशाळा, राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. हा कार्यक्रम राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान व आत्मा कृषी विभाग, अमरावती यांच्या संयुक्त सहकार्याने घेण्यात आला होता. कापूस उत्पादन क्षेत्रात व शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान यावेळी केला . या वेळी राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार देऊन विक्रमी कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांमध्ये युसुफ मुल्ला खलील मुल्ला, अनिल कडू, भास्करराव हिरगोळे आणि भाऊराव कोरडकर यांचा समावेश होता. गुणवंत कोकरे यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून विशेष सन्मान केला.याचवेळी कापूस तज्ज्ञ हर्षल ठाकूर यांनी कापूस पिकाचे नियोजन, योग्य पेरणी, पीक व्यवस्थापन, रोगनियंत्रण, उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. तर राजाभाऊ पाटील यांनी एसआरटी संदर्भातील माहिती देत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवलंबण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक मोहोड, चौधरी, कृषी अधिकारी देशमुख, ज्ञानेश्वर टिपरे, अक्षय साबळे, सुमंत पुसदेकर, दिलीप हटवार, योगेश बोबडे, यश रुद्रकार आदींनी विशेष परिश्रम घेतले. शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत आणि उत्पादनक्षम शेतीकडे प्रेरित करणारा हा कार्यक्रम कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा ठरला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर