ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

उपोषण लय बेकार, हाडं ठिसूळ होतात!:सरकारने चर्चेला बोलावल्यास मार्ग काढावा; मनोज जरांगेंचा रोहित पवारांना मोलाचा सल्ला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांचे आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच रोहित पवारांसोबत त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा देखील केली. सरकार शेतकऱ्यांचा आकडा हळू हळू कमी करत असल्याची माहिती पवारांनी जरांगे यांना दिली. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, या देशातल्या, या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे. नक्कीच शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. शेतकरी राजा आपला एकवटला आहे. कारण शेतकरी वाचला तर आपण वाचणार आहेत. आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद आहे फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही कितीही पोटतिडकीने केले तरी त्याला राजकारणच म्हटले जाणार आहे. तुम्ही आमच्या पार्टीत या, असेही जरांगे यांनी रोहित पवारांना म्हटले. मी इथून गेलो की मला पवारांचा माणूस म्हणतील पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, तुमच्या मागण्या किती मान्य केल्या जातील माहीत नाही. पण शेतकाऱ्यांची लढाई म्हणून याकडे आपण पाहिले पाहिजे. आपण राजकारण करत नसून शेतकऱ्यांसाठी रोहित पवार लढत आहेत. आता मी इथून गेलो की मला म्हणतील मी पवारांचा माणूस आहे. परवा दिवशी रातभर मी देवेंद्र फडणवीसांचा माणूस होतो. आता तिथून सुटून तुमच्या गळ्यात गुतणार आहे. माझी खूप फरफट सुरू आहे. पण माझी एक भूमिका असते जिथे जिथे अन्याय होत असतो तिथे आम्ही जात असतो. बच्चू भाऊ बसले होते तेव्हा देखील आम्ही गेलो होतो. शेतकऱ्यांसाठी आम्ही कायम सोबत आहोत. मोदी साहेब पवार साहेबांना तांब्या भरून पाणी देतात मनोज जरांगे म्हणाले, भूमिका शेतकऱ्यांची आहे त्यामुळे आपण त्याला बळ दिले पाहिजे. मला रोहित पवारांनी मला एक जीआर दाखवला. त्यात त्यांनी मला दाखवले की शब्दांचा खेळ कसा असतो. 3 वर्ष मी तेच बघून बेजार झालोय. कोणीकडे काणा आणि कुणीकडे मात्रा हाणतील, कशाचा मेळ नाही. उपोषण करू करू बेजार झालो मी. पुढे बोलताना जरांगे यांनी प्रश्न केला, तुम्हाला उपोषणाला बसायची वेळच नाही आली पाहिजे. मोदी साहेब पवार साहेबांना तांब्या भरून पाणी देते. आणि मग मोदी साहेब एवढा जीव लवतेत तर तुम्ही उपोषणाला बसून कशाला हाडकं मोडून घेता? पवार साहेबांना सांगा एक फोन फिरवा. सरकार चर्चा करायला तयार आहे, तर चर्चा करावी पुढे मनोज जरांगे म्हणाले, जर सरकार तुम्हाला चर्चेसाठी बोलवत असेल तर तुम्ही चर्चा करून मार्ग सोडवावा, असे माझे प्रामाणिक मत आहे. नाही ऐकले तर बघू. सध्या चॅनलला पाहिले मी भरणे मामा म्हणाले असे करू तसे करू मग आपण विश्वास ठेऊ. आम्ही पण ठेवला होता. जेव्हा चांगलं काम करत असतील तेव्हा मी चांगलं म्हणत असतो, नाहीतर मी लावत असतो घोडे. त्यामुळे सध्या ते काम करत आहेत म्हणून मी चांगलं म्हणतोय. परत तुम्ही म्हणाल फुटला की काय? चांगलं चालू आहे सध्या आमचं. आपले विखे पाटील साहेब काम करत आहेत, लाड भाऊ आले आहेत. त्यांनी आधी मला घोडे लावले, परत मी त्यांना लावले आता आम्ही पक्के मित्र झालो. सध्या ते दोघे आमच्यासाठी चांगलं काम करत आहेत. उपोषण जिवावर बेतण्यासारखे असते जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेणार असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत जावं. उपोषण करू नका. उपोषण लई बेकार आहे. तुम्हाला आता कळेल. तुम्ही परत दोन महिन्यांनी मला फोन कराल आणि म्हणाल उगाच उपोषणाला बसलो. तुमची तळमळ आहे शेतकऱ्यांसाठी, त्यात काही वाद नाही. पण माझे हाड ठिसुळ झाले आहेत. माझे शिरा सुद्धा हाडकाला लागले आहेत. उपोषण म्हणजे जिवावर बेतण्यासारखा आहे, असा सल्लाही जरांगे यांनी रोहित पवारांना दिला. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस:मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल, दोघांमध्ये कर्जमाफीच्या मागण्यांबाबत चर्चा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांचे आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच रोहित पवारांसोबत त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा देखील केली. सरकार शेतकऱ्यांचा आकडा हळू हळू कमी करत असल्याची माहिती पवारांनी जरांगे यांना दिली. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, या देशातल्या, या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे. नक्कीच शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. शेतकरी राजा आपला एकवटला आहे. कारण शेतकरी वाचला तर आपण वाचणार आहेत. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर