ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

एफडीएचा बडगा:गुटखा तस्करांवर थेट मकोका, नेटवर्क नष्ट करणार; तुकाराम मुंढेंचा आदेश, किरकोळ विक्रेत्यांऐवजी मुख्य सूत्रधारांवर होणार कारवाई

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुटखा, तंबाखू आणि पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आता थेट मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले आहेत. सार्वजनिक आरोग्याशी खेळून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांची माया गोळा करणाऱ्यांची साखळी कायमची मोडीत काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून केवळ किरकोळ विक्रेते किंवा टपरीवाले सापडत असल्याने मुख्य सूत्रधार मोकाट राहत होते. आता मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याने माफियांचे धाबे दणाणले आहेत. प्रामाणिक व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, हेही स्पष्ट केले आहे. ही कारवाई सार्वजनिक आरोग्याविरुद्धचा गंभीर गुन्हा मानून केली जाईल. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर न थांबता गुटखा उत्पादक, पुरवठादार, फायनान्सर, वाहतूकदार आणि गोदाम मालक अशा साखळीचा पुराव्यांसह छडा लावून नेटवर्क उध्वस्त केले जाईल. १७ दिवसांत कोट्यवधींचा अवैध मुद्देमाल जप्त एफडीएचे आयुक्त म्हणून मुंढे यांनी पदभार स्वीकारताच २५ मे ते ११ जून या १७ दिवसांत धडक मोहीम राबवली. या काळात तब्बल ३ कोटी २७ लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला व ३५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मकोका लावण्यासाठी तीन निकष तपासले जातील १. गुन्हा दखलपात्र असून त्यात ३ वर्षे किंवा अधिक शिक्षेची तरतूद असावी.
२. दुसरा, मागील १० वर्षांत एकापेक्षा अधिक आरोपपत्रे दाखल असावीत.
३. दोन किंवा अधिक व्यक्तींनी संघटितपणे हा गुन्हा केलेला असावा. अवैध व्यापारावर संघटित गुन्हेगारी मानूनच कारवाई केली जाणार राज्यभरात कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक व्यापाऱ्यांना कोणताही त्रास देणे हा या कारवाईचा उद्देश नाही. मात्र, सार्वजनिक आरोग्याला हानी पोहोचवून संघटितपणे अवैध व्यापार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. केवळ अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन नसून सार्वजनिक आरोग्याविरुद्धचा गंभीर संघटित गुन्हा मानूनच ही कारवाई केली जाईल.-तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन दूध भेसळप्रकरणीही डेअरी चालकांना सक्त ताकीद मुंढे यांनी दूध भेसळीवरही लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत डेअरी चालकांची बैठक घेऊन त्यांनी सक्त सूचना दिल्या. दुधात पाणी किंवा रसायनांची भेसळ खपवून घेतली जाणार नाही. ग्राहकांपर्यंत जाणारे दूध सुरक्षित, दर्जेदारच असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट सुनावले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर