ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

तामशी येथे खरीपपूर्व शेतकरी मेळाव्यात कोरडवाहू शेतीचे धडे:पावसाच्या खंडात जलसंधारण उपाय व अतिवृष्टीत पाणी निचऱ्यासाठी प्रात्यक्षिक‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खतांचा संतुलित वापर या राष्ट्रीय मोहिमेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने बाळापूर तालुक्यातील तामशी येथे नुकताच खरीपपूर्व शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून, तसेच संशोधन संचालक डॉ. एस. एस. माने व कृषिविद्या विभागाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनिता चोरे यांच्या मार्गदर्शनात ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’ व या मेळाव्याचे नेटके आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जल व मृद संधारण अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश पातोडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एम. गणवीर, तामशीचे सरपंच आनंदा पातोडे, उपसरपंच भगवान पातोंड, अकोला मनपाचे नगरसेवक हर्षद भांबेरे आणि पिंपळगावचे माजी सरपंच विजय महानकर उपस्थित होते. बियाणे व साहित्याचे वाटप ः शेतकऱ्यांमध्ये जैविक जीवाणू द्रव्यांच्या बीजप्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी विद्यापीठाने निर्मित केलेल्या पी.डी.के.व्ही. बायो कन्सोर्टिया आणि कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाच्या घडीपत्रिकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जलतज्ज्ञ डॉ. राजेश पातोडे यांनी ‘एल-निनो’आणि त्याचा पावसावर होणाऱ्या संभाव्य परिणामाविषयी शेतकऱ्यांना सतर्क केले. त्यांनी पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, जैविक बांध, पावसात दीर्घकाळ खंड पडल्यास मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय आणि अतिवृष्टी झाल्यास शेतातून पाण्याचा सुरक्षित निचरा करण्यासाठी चर कसे खोदावेत, याचे तांत्रिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी हर्षद भांबेरे आणि विजय महानकर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यापीठाच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सांगितली जैविक बीजप्रक्रियेची पद्धत रविकिरण माळी यांनी शेतकऱ्यांना जैविक बीजप्रक्रियेचे महत्त्व व ती करण्याची पद्धत समजावून सांगितली. त्यानंतर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एम. गणवीर यांनी माती परीक्षण, मृदा आरोग्य पत्रिकेनुसार शिफारशीत खतांचा संतुलित वापर, शेणखत, कंपोस्ट खत शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्याबाबत माहिती दिली. तसेच कोरडवाहू शेतीतील आपत्कालीन पीक नियोजन व आंतरपीक पद्धतीवर प्रकाश टाकत त्यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे “महाविस्तार अॅप” डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. कृषी विभागाच्या त्यांच्या या आवाहनास उपस्थित शेतकऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर