ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठीचं नाटक:गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंढरपुरात सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून केवळ प्रसिद्धीसाठीचे “नाटक” असल्याचा आरोप करत पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. सांगली येथे माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “रोहित पवारांना अभिनय चांगला जमत असल्यामुळे ते आंदोलनाच्या माध्यमातून नाटक करत आहेत. हे आंदोलन आहे की एखाद्या चित्रपटाचे शूटिंग, असा प्रश्न पडतो.” त्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला “नटरंग चित्रपटाच्या शूटिंगसारखी ही एक्टिंग सुरू आहे,” असा टोला लगावला. एक-दोन महिने आंदोलनावर बसू द्या- पडळकर यावेळी पडळकर यांनी थेट सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनालाच आवाहन केले. “जोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साखर कारखानदारांकडून पूर्ण एफआरपी मिळत नाही, तोपर्यंत रोहित पवारांनी उपोषण सुरू ठेवावे. पोलिसांनी आंदोलनस्थळी कडक सुरक्षा ठेवून त्यांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नये,” असे ते म्हणाले. “एक-दोन महिने आंदोलनावर बसू द्या, तेव्हाच आंदोलनाची खरी परीक्षा होईल,” असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करताना पडळकर म्हणाले की, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान जर कुणी केले असेल, तर ते पवार कुटुंबाने केले आहे. शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कारखान्यांबाबत उत्तर द्यावे.” दरम्यान, महायुती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी लागू करावी, या मागणीसाठी रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळत असताना, पडळकर यांच्या टीकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मुलं म्हणतायत बाबा घरी या, पण माघार नाही!: रोहित पवारांचा सरकारला इशारा, कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत आंदोलन सुरूच पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी कर्जमाफीतील जाचक अटी हटवून सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर