ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

जनगणना अभियानाचा पहिला टप्पा 100 टक्के झाला पूर्ण:आयुक्त लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी १२ जून रोजी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते संबंधित झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. जनगणना अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता आशिष अवसरे व त्यांच्या कर्मचारी वर्गाचा, झोन क्र. ४ चे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे व त्यांच्या कर्मचारी वर्गाचा, झोन क्र. ५ चे सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे, उपअभियंता विवेक देशमुख व त्यांच्या कर्मचारी वर्गाचा तसेच झोन क्र.३ चे उपअभियंता नितीन भटकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी जनगणना अभियान यशस्वी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. जनगणना ही शहराच्या विकास आराखड्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया असून सर्वांनी समन्वयाने काम करून अभियान शंभर टक्के पूर्ण केले, ही महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सत्कार समारंभात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांनीही जनगणना अभियानाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील शासकीय उपक्रमांमध्येही अशीच कार्यक्षमता दाखविण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, शहर जनगणना अधिकारी योगेश पीठे, सहाय्यक आयुक्‍त भूषण पुसतकर, नितीन बोबडे, अजय विंचुरकर, जनगणना अधिकारी अक्षय निलंगे, कैलास कुलट यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते. शहर जनगणना अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक जनगणना अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल शहर जनगणना अधिकारी तथा उपायुक्त योगेश पिठे यांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शन, नियोजन आणि समन्वयामुळे अभियान निर्धारित वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण झाल्याचे यावेळी मनपा आयुक्तांद्वारे नमूद करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर