ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वीज वितरण कंपनीवर काँग्रेसचा मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक, विशेषतः महिला प्रचंड त्रस्त झाल्या आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या पुढाकाराने महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आंदोलनकर्त्यांचा कठोर बाणा लक्षात घेता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचे मान्य केले. चांदूर रेल्वे शहरात आणि विशेषतः छत्रपती शिवाजी नगर भागात दिवस-रात्र कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तासनतास वीज खंडित होत असल्याने सामान्य जनता, व्यापारी आणि विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत. अंधारामुळे घरगुती कामेही खोळंबली असून महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आंदोलनादरम्यान जगताप यांनी मोर्चातील महिला व त्रस्त जनतेच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. महिलांचा वाढता रोष आणि वीरेंद्रभाऊ जगताप यांचा कडक इशारा पाहून वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अखेर नमते घेतले. शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची कारणे शोधून, येत्या तीन दिवसांच्या आत सर्व तांत्रिक समस्या निकाली काढण्यात येतील आणि वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे लेखी आश्वासनही अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले. आंदोलनात अमोल होले, अनिस भाई सौदागर, श्रीनिवास सूर्यवंशी, राजीव लांजेवार, प्रफुल्ल कोकाटे, रुपेश पुडके, सागर गरुड, सतपाल वरठे, रितेश शेळके, रोहित बाबर, राजश्री माने, आशा गरुड, पूजा यादव, सारिका हटवार सहभागी होते. …तर भविष्यात याहून तीव्र आंदोलन अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आगामी तीन दिवसात चांदूर रेल्वे शहरासह छत्रपती शिवाजी नगरमधील वीज समस्या सुटली नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार आहे. तसा इशाराच महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला असून या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल, असेही बजावण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर