ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

शेतकऱ्यांची सर्व अटी हटवून सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करा:आचारसंहितेचं नाव पुढे करून कर्जमाफी लांबवू नका, अन्यथा रस्त्यावर उतरू- शशिकांत शिंदे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रोहित पवार हे पांडुरंगाला स्मरत आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर टीका करणारे वडापाव खात आंदोलन करत असतील तो त्यांचा अनुभव असेल, तो त्यांनी सांगितला असेल असे म्हणत असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनासंदर्भात मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. काल शरद पवारांशी चर्चा झाली ते वरीष्ठ पातळीवर चर्चा करणार आहे. जर काही झाले नाही तर आमचा पक्ष रस्त्यावर उतरणार असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी असलेल्या सर्व अटी काढून सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी करावी. यासाठी नियम बनवावे आणि तशी योजना जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे. सरकार आता आचारसंहितेचे नाव पुढे करत आहे. पण ज्यावेळी कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा विषय घेतला त्यावेळी आचरसंहिता कुठे होती? असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला आहे. आचारसंहितेचा जीआर काढायचा तो तुम्ही निवडणुकीनंतर काढू शकतात. पण एखाद्या पक्षाचा लोकप्रतिनिधी आंदोलनाला बसला म्हणून निर्णय लांबवत नेऊ नये ही आमची सरकारला विनंती आहे.

रोहित पवारांना अनेकांचा पाठिंबा शशिकांत शिंदे म्हणाले की, रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते मंडळी रोज येत आहेत. काँग्रेसचे सुनील केदार सुद्धा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. सराकरने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यांचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील. निवडणूक होत असते पण महाराष्ट्राला प्रामाणिकपणे उभे करणारा शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. कर्जमाफीचे नियम शिथील करा शशिकांत शिंदे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीची योजना सरकारनेच जाहीर केली आहे. त्या निकषात जे शेतकरी बसत नाही इतकेच आमचे म्हणणे आहे. तुमचे नियम आणि अटी थोडे शिथील करायचे आहे. यामुळे किती बँका आणि संस्था बुडणार आहेत? ही दिल्यावर पुन्हा कर्जमाफी देणार नाही,असे सांगितले तर तुम्हाला दबाव येणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर