ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मुंबईत बांगलादेशींविरोधात धडक मोहीम:किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई मोहिमेला सुरुवात

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी भाजपने मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न व बांगलादेशी घुसखोरांविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने या प्रकरणी बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई अभियानाची घोषणा केली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात मुलुंड येथून ही मोहीम सुरू करण्यात आली. यामुळे पुढील काही दिवस मुंबईचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गत अनेक महिन्यांपासून बांगलादेशी घुसखोरांविरोधात रान पेटवले आहे. ते या प्रकरणी राज्यातील विविध शहरांना भेटी देऊन हा मुद्दा उपस्थित करत आहेत. आता त्यांनी मुंबईच्या मुलुंड परिसरातून बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मोहीम सुरू केली आहे. रेल्वे स्थानक परिसर प्रवाशांसाठी मोकळा करणे व अनधिकृत घुसखोरांचे अतिक्रमण हटवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले. मुलुंड येथून मोहिमेला सुरुवात मुलुंड येथून ही मोहीम सुरू करताना भाजप नेते मनोज कोटक व मिरीह कोटेचा यांच्यासह पोलिस प्रशासन व मुंबई महापालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, सर्वोच्च न्यायालय व प्रशासकीय नियमांनुसार रेल्वे स्थानकापासून 100 मीटरच्या परिसरात एकही फेरीवाला असता कामा नये. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी भाजप आता रस्त्यावर उतरली आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल. या मोहिमेचे मुख्य लक्ष मुंबईतील मुंब्रा व ज्या भागांत बांगलादेशी माफियांचा प्रभाव आहे, तो परिसर फेरीवाला मुक्त करण्याचा आहे. मुलुंड येथील कारवाईनंतर आता भाजपने आपला मोर्चा ईशान्य मुंबईतील इतर उपनगरांकडेही वळवला आहे. पुढील 15 दिवसांच्या कालावधीत भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर व विद्याविहार यासारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानक परिसरांतही हे अभियान राबवण्यात येणार आहे. प्रशासकीय अधिकारी व पोलिसांच्या मदतीने अनधिकृत फेरीवाल्यांवर थेट कारवाई करून मुंबईकरांना या जाचातून मुक्त करण्याचा मानस भाजपने व्यक्त केला आहे. 1500 च्या लोकसंख्येत 15,570 जन्म नोंदी उल्लेखनीय बाब म्हणजे किरीट सोमय्या यांनी नांदेड जिल्ह्यातील सावळेश्वर येथील जन्म प्रमाणपत्राचाही घोटाळा समोर आणला आहे. ते म्हणाले, सावळेश्वर चा 15,570 जन्म प्रमाणपत्र घोटाळा. मी आज सावळेश्वरची (नांदेड) भेट घेतली. 1 मे 2025 ते 30/11/2025 ह्या 7 महिन्यांत 15,570 जन्म नोंदी वाढविण्यात आल्या. त्यापैकी एकही व्यक्ती ह्या गावात राहत नाही. सावळेश्वरची लोकसंख्या 1,500 आहे. मे महिन्यात – 01
जून महिन्यात – 112
जुलाई महिन्यात – 1,132
ऑगस्ट महिन्यात – 4,995
सप्टेंबर महिन्यात – 2,526
ऑक्टोबर महिन्यात – 4,126
नोव्हेंबर महिन्यात – 2,677 जन्म नोंदी सावळेश्वर ग्रामपंचायतमध्ये झाले. पोलिसांनी FIR गुन्हा दाखल केला, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर