ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कुर्डुवाडीतील अपघातात 1 ठार, चार जण जखमी:डीसीसी बँकेचे अधिकारी अनिल बाबर गतप्राण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (डीसीसी बँक) अधिकारी अनिल कोंडीबा बाबर (वय ५८, रा. टेंभुर्णी,) यांचे शनिवार दि. १३ रोजी टेंभुर्णी- कुर्डुवाडी रोडवर माळी पाटीजवळ असलेल्या वळणावर २ वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात निधन झाले. तर चारचाकी गाडीतील चालकासह चौघे जखमी झाले आहेत. माढा तालुक्यात सीनिअर बँक इन्स्पेक्टर (वरिष्ठ शाखा निरीक्षक) या पदावर कार्यरत असलेले अनिल कोंडीबा बाबर हे कुर्डुवाडी शाखेतील कर्जमाफी संदर्भातील कामकाज उरकून त्याची एम एच ४५ एन ४०६७ ही आय टेन ही चारचाकी गाडी घेऊन टेंभुर्णीकडे निघाले होते. टेंभुर्णी- कुर्डुवाडी रोडवर कुर्डु हद्दीतील माळी पाटी येथील गाडी वळणावर आली असताना समोरून येणारी चारटाकी एमएच ४५ बीडी ७००८ या गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अनिल बाबर हे जागीच मयत झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी व कुर्डुवाडीतील ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती‌. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, सून असा परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर