ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संजय राऊत सांगतील अन् खातेवाटप होईल का?:छगन भुजबळांचा टोला, राज्यसभा उमेदवारीवरही सोडलं मौन

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “अजित दादांचे अर्थखाते आता मुख्यमंत्री चांगले सांभाळत आहेत,” या संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना, “खातेवाटपाबाबत काय राऊतांशी बोलून निर्णय घ्यायचे का?” असा खोचक टोला भुजबळांनी लगावला. तसेच, राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याबाबत पक्षीय पातळीवर काय घडामोडी झाल्या, यावरही त्यांनी जाहीर भाष्य केले. “खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा” संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, “संजय राऊत सांगतील आणि त्याप्रमाणे खातेवाटप होईल असे कसे होईल? खातेवाटपाबाबत आता काय राऊतांशी बोलावे लागेल का? राज्यातील खातेवाटपाबाबत जे काही निर्णय आहेत, ते सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतलेले आहेत. त्यामुळे त्यात इतरांनी ढवळाढवळ करण्याची गरज नाही.” राज्यसभा उमेदवारी आणि ‘समीर भुजबळांच्या’ मंत्रिपदाचा प्रस्ताव! या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत पडद्यामागे काय घडले, याचा खुलासा केला. “मी स्वतः राज्यसभेवर जाणार होतो. मात्र, मी जात असताना इतर मुलांना (तरुण नेत्यांना) देखील संधी मिळाली पाहिजे, हा विचार पुढे आला. त्यामुळे मी पक्षाकडे प्रस्ताव ठेवला होता की, माझ्या मुलांनाही संधी द्या; इथे समीर भुजबळ यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपद द्या आणि मी दोन वर्षांसाठी राज्यसभेवर जातो. परंतु, शेवटी पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे,” असे भुजबळ म्हणाले. पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. “ज्यांना संधी मिळाली ते आता गेले आहेत, पक्षाचा निर्णय अंतिम असतो,” असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “ज्या पक्षासाठी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून…” आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देताना भुजबळ भावूक झाले. “ज्या पक्षासाठी मी शरद पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले, तिथे नेहमीच पक्षाच्या हिताला प्राधान्य दिले,” असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. जैन यांच्या निवडीनंतर आपल्या मनात कोणतीही कटुता नसल्याचे सांगत त्यांनी पुढील पक्षीय कार्यास शुभेच्छा दिल्या. माझ्यावरील टीका योग्यच!:वादग्रस्त कॉमेडियन प्रणीत मोरेचा जाहीर माफीनामा, म्हणाला- ‘एक संधी द्या, स्वतःला बदलून दाखवेन’ ‘370 रुपयांची बिर्याणी’ वादामुळे प्रचंड टीकेचा सामना करणारा स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर समोर आला असून त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तरुणाला वेळेवर रोखता आले असते, मात्र तसे करण्यात आपण अपयशी ठरलो, अशी कबुली देत त्याने ही चूक आपलीच असल्याचे मान्य केले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर