ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हिंगोलीत शाळांमध्ये आजपासून वाजली पहिली घंटा:’पाऊल ठसे’ घेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांसह खाजगी शाळांमध्ये सोमवारी ता. १५ नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. नव प्रवेशितांना गुलाब पुष्प, गणवेश पाठयपुस्तके देण्यात आली तर काही ठिकाणी मुलांच्या पायाचे ठसे घेऊन शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी शाळामध्ये अल्हाददायक वातावरण दिसून आले. हिंगोली जिल्हयातील सुमारे 1 हजार शाळांमधून नवीन शैक्षणिक वर्षात शाळा प्रवेशोत्सवाची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्‍यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजल्या होत्या. बहूतांश शाळांच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रंगीबेरंगी फुगे लावण्यात आले होते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाबाची फुले आणण्यात आली होती. दरम्यान, अंतूलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल, नवीन गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नव प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रातिनिधीक स्वरूपात पायाचे ठसे घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातील इतर ठिकाणीही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची गावातून मिरवणुकही काढण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेचे वातावरण अल्हाददायक झाले होते. विद्यार्थी देखील हसत खेळत शाळेत प्रवेशीत झाले. जिल्ह्यात शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून याबाबतच्या सुचनाही जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर