ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला:पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅड ऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी पायलकडून एक मोठी चूक झाल्याची घटना आज पुण्याच्या पुरंदर तालुक्यात घडली. पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले. या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पण भुजबळ हा प्रकार बाजूला सोडून आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या दिशेने पुढे निघून गेले. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. पण पायलटचा खानवडी गावातील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा समज झाला आणि त्याने त्या मैदानातच भुजबळांचे हेलिकॉप्टर उतरवले. या मैदानापासूनच काही अंतरावरच हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरल्याचे पाहून तिथे हजर असलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. पोलिसांनी तत्काळ पायलटला योग्य ती माहिती दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर तेथून हलवण्यात आले. तत्पूर्वी, भुजबळ कारने तेथून कार्यक्रमाच्या दिशेने निघून गेले. मोठा अपघात थोडक्यात टळला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पायलटच्या अशाच एका चुकीने विमान अपघातात बळी गेला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या बाबतीत हा प्रकार घटना घडल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. योग्य नियोजन असतानाही हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरवणे अत्यंत धोकादायक आहे. विशेषतः लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या अपघाताच कारणीभूत ठरली असती, अशी संतप्त भावना या प्रकरणी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आीहे. हेलिपॅड आकाशातून स्पष्ट दिसत होते का? पायलटकडून नेमकी कशी वा का झाली? काही तांत्रिक अडचण होती का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या प्रकरणी शोधली जाणार आहेत. दरम्यान, या घटनेमुळे व्हिआयपी लोकांची सुरक्षा व समन्वय या प्रकरणी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रोहित पवारांनी व्यक्त केली चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते एका पोस्टमध्ये म्हणाले, छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभालदुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलीकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढं काळजी घेईल, ही अपेक्षा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर