ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

सरकारचा मोठा निर्णय:अजित पवार विमान दुर्घटनेच्या CID चौकशीचे आदेश; गूढ उकलणार? अपघातस्थळावर प्रवेश बंदी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 तारखेला, बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, राज्यभर शोककळा पसरली आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो समर्थकांनी अजित दादा अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवरही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अंत्यसंस्कारानंतर आता या विमान अपघाताच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेची CID चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तपास प्रक्रियेत कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने याआधीच अपघातस्थळी भेट देऊन आवश्यक नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. विमानाचे अवशेष, जळालेल्या भागांचे नमुने आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे. हा संपूर्ण तपास बारामती पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ‘एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट’च्या अनुषंगाने केला जाणार आहे. CID तपासात फॉरेन्सिक अहवाल, एटीसी लॉग्स आणि प्राथमिक माहिती यांचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, हे विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात आले होते. त्या वेळी वैमानिकांना सांगण्यात आले की हवामान सामान्य आहे, वाऱ्याचा वेग कमी आहे आणि दृश्यमानता सुमारे 3000 मीटर इतकी आहे. यानंतर वैमानिकांनी रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याची माहिती दिली. मात्र, त्यांना रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचे त्यांनी एटीसीला कळवले होते. थोड्या वेळाने पायलटने पुन्हा एटीसीला कळवले की रनवे दिसू लागल्यावर ते माहिती देतील. त्यानंतर सकाळी 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे एटीसीकडून कळवण्यात आले. मात्र, यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या दृश्याने नियंत्रण कक्षातही एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण चौकशी केली जाणार या अपघाताच्या शेवटच्या काही मिनिटांत नेमके काय घडले, याचा उलगडा CID चौकशीतून होण्याची शक्यता आहे. वैमानिकांची भूमिका, तांत्रिक बिघाड, हवामान स्थिती आणि एटीसीशी झालेला संवाद या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. अजित पवार यांच्यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्याच्या मृत्यूमुळे हा तपास अत्यंत संवेदनशील मानला जात असून, कोणतीही शक्यता गृहित धरून चौकशी केली जाणार आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर