ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का?:गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्यावरून दमानिया संतापल्या, NCP-BJP वर घणाघात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याऐवजी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना आणि चक्क तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निषेध केला असून, “राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंधित व्यक्ती जनतेच्या हिताची कामे करतील का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील कुख्यात गुंडांच्या टोळीतील तीन सदस्यांनी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एबी फॉर्म भरून उमेदवारी दाखल केली आहे. केवळ राष्ट्रवादीच नाही, भाजपकडूनही अपहरण, खंडणी आणि गोळीबाराचे आरोप असलेल्या गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. हे प्रकरण महापालिका निवडणुकीत चांगलेच तापण्याची शक्यता असून, अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. . नेमके काय म्हणाल्या अंजली दमानिया? अंजली दमानिया यांनी विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. पुण्याच्या राजकारणात दहशत असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना पक्षाने तिकीट दिले आहे, ज्या सध्या तुरुंगात आहेत. यावर “नगरसेवकाचे काम कचरा व्यवस्थापन, गटारांची सफाई, पाणीपुरवठा आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा देणे हे असते. ज्या महिला स्वतः तुरुंगात आहेत, त्या जेलमधून या सोयी नागरिकांना कशा काय पुरवणार आहेत?” असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. तुरुंगातून मूलभूत सुविधा कशा देणार? नगरसेवक हा जनतेचा प्रतिनिधी असतो. कचरा व्यवस्थापन, गटारांची साफसफाई, प्राथमिक शिक्षण, दवाखाने, खेळाची मैदाने अशा मूलभूत सुविधा नागरिकांना देणे हेच नगरसेवकाचे काम आहे. मात्र सध्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाने आंदेकर कुटुंबातील, सध्या तुरुंगात असलेल्या दोन महिलांना तिकीट दिले आहे. तुरुंगातून त्या मूलभूत सुविधा, ह्या बायका कशा देणार आहेत? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. अशा लोकांकडून कामे होतील का? ह्या दोघींव्यतिरिक्त अजित पवार गटाने गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आणि खुनाच्या आरोपाखाली असलेल्या बापू नायर यांच्या पत्नीला, गजा मारणे यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे, भाजपने अपहरण, खंडणी आणि गोळीबाराच्या आरोप असलेल्या देविदास चोर्घे यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. काय अपेक्षा ठेवणार जनता ह्यांच्याकडून ? अशा लोकांकडून कचरा उचलला जाईल का? गटारे साफ होतील का? नागरिकांची कामे होतील का? राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी केला. हे ही वाचा… NCP ने गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नाही:अजित पवारांनी सचिन खरातांवर फोडले खापर; पण अर्जासोबत AB फॉर्म ‘राष्ट्रवादी’चेच ‘राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नाही. आमची सचिन खरात यांच्यासोबत युती राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जागावर उमेदवार देण्याचा त्यांना अधिकार आहे,’ असे म्हणत अजित पवारांनी या साऱ्या प्रकरणाचे खापर खरातांवर फोडत वादातून पळ काढण्याचा आज प्रयत्न केलाय. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर