ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नेवासा- देवगड मार्गावर असलेल्या जंगलात वैद्यकीय कचऱ्याचा खच

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नेवासे-देवगड मार्गावरील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या सिरिंज, इंजेक्शनच्या सुया, औषधांच्या रिकाम्या व फुटलेल्या बाटल्या तसेच वैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य यांचा अक्षरशः खच रस्त्यालगत वनविभागात आढळून आला आहे. रुग्णालये व दवाखान्यांमधून निर्माण होणारा वैद्यकीय जैविक कचरा हा अत्यंत धोकादायक मानला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने स्पष्ट नियमावली तयार केलेली असताना हा कचरा जंगलात फेकण्याचे धाडस नेमके कोणी व का केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात जैविक कचरा संकलनासाठी अधिकृत यंत्रणा कार्यरत असून नियुक्त एजन्सीमार्फत रुग्णालये व दवाखान्यांतून नियमित कचरा गोळा केला जातो. त्यासाठी संबंधित संस्थांकडून शुल्कही आकारले जाते. संबंधित शुल्क वाचवण्यासाठीच हा कचरा अधिकृत यंत्रणेकडे न देता जंगलात टाकण्यात आला असेल तर तो केवळ नियमभंग नसून सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणारा गंभीर प्रकार मानला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कारवाया सुरू आहेत. त्याचप्रमाणे जैविक कचऱ्याच्या बेकायदेशीर विल्हेवाटीच्या घटनांवरही कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कचरा कोणत्या रुग्णालयातून अथवा दवाखान्यातून आला याचा शोध घ्यावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी भागवत दहिफळे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोहसीन बागवान, आरोग्य विस्तार अधिकारी गोविंद व्यवहारे व नगरपंचायतीचे सुधीर चित्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचनामा करण्यात आला. दरम्यान, सदरच्या मेडिकल कचऱ्यामध्ये सापडलेल्या कागदांवरून सदरचा मेडिकल कचरा शहरातील एका वैद्यकीय व्यवसायिकाचा असल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत नेवासा नगरपंचायत आणि कारवाईसाठी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर