ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भंडाऱ्याच्या सीमेवर श्रद्धेचा महाकुंभ:१५० वर्षांची परंपरा असलेल्या ‘गरदेव’ यात्रेत भक्तांचा जनसागर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या तुमसर तालुक्यातील आष्टी या आदिवासी बहुल गावात १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली ‘गरदेव यात्रा’ यंदा मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. होळीच्या पाळव्याला, म्हणजेच धूलिवंदनच्या दिवशी भरणाऱ्या या ‘वांगेगारी’ यात्रेने संपूर्ण भंडारा जिल्हा भक्तीमय झाला असून, यात्रेनिमित्त राज्याच्या सीमा ओलांडून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होणार आहेत. ​भंडारा जिल्हा हा तलाव आणि संस्कृतीचा जिल्हा मानला जातो. या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे आष्टी येथील गरदेव यात्रा. सुमारे १५० वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरू आहे. आदिवासी संस्कृती आणि हिंदू धर्मातील महादेव भक्तीचा हा एक सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. आष्टीची ही यात्रा ‘मोठी यात्रा’ म्हणून ओळखली जाते, तर कवलेवाडा येथील यात्रेला ‘छोटी यात्रा’ म्हणतात. ​या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नंदी (बैल). विदर्भातील ग्रामीण भागात महाशिवरात्रीला महादेव दर्शनासाठी जाण्याची मोठी प्रथा आहे. जे भाविक ‘छोटा महादेव’ (चौरागड) किंवा ‘मोठा महादेव’ (पचमढी) येथे दर्शनाला जातात, त्यांना परतीच्या प्रवासात किंवा धूलिवंदनला गरदेवसमोर नतमस्तक व्हावे लागते, अशी धारणा आहे. अनेक शेतकरी आणि भाविक आपल्या कुटुंबासह आणि सजवलेल्या नंदीसह यात्रेत येतात. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मध्य प्रदेशातील शिवणी, बालाघाट आणि कटंगी भागातूनही हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने येथे हजेरी लावतात.
​गरदेव यात्रेचा उत्साह केवळ आष्टीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही यात्रा दीड दिवसांसाठी भरते. यामध्ये प्रामुख्याने ​मोहाडी तालुक्यातील करडी, ​तुमसर तालुक्यातील कवलेवाडा, पालांदूर, ​पवनी तालुक्यातील नेरला तर ​लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव असतो. सकाळी सूर्योदयापासूनच गरदेवच्या दर्शनासाठी मैलोन्मैल रांगा लागल्या असतात. प्रशासनाकडून आणि स्थानिक ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याचे तसेच सुरक्षेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. कुटुंबीय नवस फेडण्याची प्रथा पाहुनगावचे सरपंच संदीप कोरे याविषयी बोलताना म्हणाले, आमच्या पूर्वजांपासून ही गरदेवची सेवा सुरू आहे. आष्टीच्या यात्रेत आल्याशिवाय आमची महादेवाची वारी पूर्ण होत नाही. यंदा नंदीला घेऊन आम्ही सर्व कुटुंबीय नवस फेडायला आलो आहोत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर