ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषद निवडणुकीत भाजपचे‎उमेदवार नंदकिशोर महाजन यांना‎उमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिली‎याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट‎चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल‎करण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजी‎टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी‎दिल्लीवरून उमेदवारी जाहीर झाल्याचे‎स्पष्ट केले होते; मात्र रविवारी‎महायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री‎तथा खासदार रक्षा खडसे यांनी‎उमेदवार दिल्लीचा नव्हे तर मंत्री गिरीश‎महाजनांनी दिल्याचा दावा केल्याने‎खळबळ उडाली; मात्र महाजनांनी‎खडसेंचा हा दावा खोडून काढत हा‎निर्णय वैयक्तिक नसून, केवळ दिल्ली‎व पक्षाचा असल्याचे स्पष्ट केले.‎ विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक‎स्वराज्य संस्था मतदारसंघाची‎निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर‎येऊन ठेपली आहे. महायुतीमधील‎अंतर्गत तिढा सुटल्यानंतर रविवारी‎एमआयडीसीत महायुतीचा मेळावा‎झाला. व्यासपीठावर पालकमंत्री‎गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा‎खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,‎भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री‎ संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत सोनवणे, मंगेश चव्हाण, अमोल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वच नेत्यांनी जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला असून, विजय निश्चित असल्याचा दावा केला. मेळाव्यात नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीवर बोलताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश महाजन आहेत. ही जागा भारतीय जनता पक्षाची पारंपरिक जागा राहिली असून, उत्तर महाराष्ट्राचे सर्व निर्णय गिरीश महाजन यांनीच घेतले आहेत. उमेदवारीसाठी प्रत्येकाला आपले नाव यावे असे वाटणे स्वाभाविक आहे; परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यावर सर्वांना काम करावेच लागते. पक्षात कोणतीही नाराजी नाही. खडसे यांच्या या विधानाने महाजन यांनीच किंगमेकरची भूमिका बजावल्याचे अधोरेखित झाले. रक्षा खडसे यांनी दिलेले हे क्रेडिट मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ नाकारले. ते म्हणाले नंदकिशोर महाजन हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीहून झाला आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी एकाने घेतला असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्याच्यावर माझा किंवा इतर कोणत्याही नेत्याचा शिक्का मारणे किंवा त्यांना गिरीश महाजनांचा उमेदवार म्हणणे चुकीचे आहे, असे बोलूही नये. महाजन यांनी त्यांच्या वक्तव्याला धन्यवाद म्हणत थेट पक्षश्रेष्ठींचाच शब्द अंतिम असल्याचे स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्षांनी बोलणे टाळले‎
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले‎नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात १७ ठिकाणी‎निवडणुका होत आहेत. सर्व १७ जागांवर‎महायुतीचेच उमेदवार जिंकून येतील.‎जळगावची निवडणूक ही केवळ आता‎औपचारिकता उरली आहे. महायुतीतील‎अंतर्गत नाराजीबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न‎विचारला असता चव्हाण यांनी त्यावर‎बोलणे स्पष्टपणे टाळले.‎ ५५० मतांचा पालकमंत्र्यांचा दावा‎ पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितले की‎निवडणुकीतील ५४ अपक्ष उमेदवार हे दुसऱ्या‎कोणत्याही पक्षाचे नसून आपल्याच‎महायुतीचे आहेत. ७० टक्के निधी खर्च‎करण्याचे अधिकार आमदारांना असून, त्यांनी‎नगरसेवकांना निधी दिला पाहिजे. विधान‎परिषदेवर निवडून आल्यानंतर नंदकिशोर‎महाजन यांनी छोट्या नगरपरिषदांच्या‎विकासाकडे विशेष लक्ष द्यावे.‎ नगरसेवकांची घेतली हजेरी;‎सहलवारी टळल्याने नाराजी‎ मत फुटू नये म्हणून नगरसेवकांना‎अज्ञातस्थळी सहलीवर पाठवण्याची पद्धत‎आहे; मात्र यंदा ही सहलवारी टळल्याने‎काही नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर‎होता. मतदारांवर पकड ठेवण्यासाठी‎रविवारी चक्क मेळाव्यातच नगरसेवकांची‎हजेरी घेण्यात आली. तिन्ही‎जिल्हाध्यक्षांवर ही जबाबदारी होती.‎यामध्ये जळगावचे ४७ तर शिवसेनेचे‎(शिंदे गट) २३ नगरसेवक उपस्थित होते.‎जे गैरहजर होते त्यांनी संपर्क साधून‎आपण बाहेरगावी असल्याचे कळवले.‎ मंत्र्यांची मतदारांना गिफ्ट ऑफर‎ मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गिरीश‎महाजन यांनी नगरपालिकांना थेट फंडाची‎ऑफर दिली. आपल्याकडे ५५० मते आहे.‎ज्या नगरपरिषदा, नगरपालिका सकाळी १०‎वाजेच्या आत १००% मतदान पूर्ण करतील,‎त्यांना निधी दिला जाईल असे सांगितले.‎ महायुतीची रणनीती अशी‎ महायुतीचे पदाधिकारी‎प्रत्येक गावात जाऊन‎नगरसेवकांना मतदान‎कसे करावे, याचे‎प्रात्यक्षिक देणार.‎
मतदानाच्या दिवशी ७‎बूथ असून, प्रत्येक‎बूथची जबाबदारी‎निश्चित आमदारांवर‎सोपवण्यात आली आहे.‎
महायुती उमेदवाराला‎राज्यात जास्त मताधिक्य‎मिळवून देण्याचा निर्धार.‎
सकाळी १० वाजेच्या‎आत १०० % मतदान‎करणाऱ्या नपाला निधी.‎
ज्या मतदारांना काही‎कारणास्तव मतदान‎करणे शक्य नाही,‎त्यांच्या जागी येणाऱ्या‎दुसऱ्या व्यक्तीची‎माहिती तत्काळ दिली‎जाणार.त्यादृष्टीने‎नियोजन बैठकीत‎करण्यात आले.‎
मतदार असलेल्या‎सर्व नगरसेवकांना‎मतदानाच्या आदल्या‎दिवशी बाहेरगावी न‎जाण्याच्या कडक‎सूचना देखील बैठकीत‎ देण्यात आल्या आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर