ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर:आता मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’च्या वापराचा उल्लेख बंधनकारक – मंत्री झिरवाळ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात 25 मार्च 2026 पासून मोहीम राबवली जात आहे. पनीरमधील वाढत्या भेसळीची गंभीर दखल घेत तसेच लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने, मंत्री झिरवाळ यांनी पनीरच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेल्या ‘ॲनालॉग’वर कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्याच्या या निर्णयाला केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाकडूनही पाठिंबा मिळाला असून तसे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई अनेक हॉटेल्समध्ये पनीरऐवजी स्वस्त पर्यायांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याने तक्रार करण्यात आली होती. मात्र, नव्या नियमानुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटना त्यांच्या मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर पदार्थात ‘नैसर्गिक पनीर/चीज’ वापरले आहे की ‘चीज ॲनालॉग’, हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल. खाद्यपदार्थ विक्रेते किंवा हॉटेल चालक पनीर म्हणून चीज ॲनालॉगची विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे की, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नुसार ग्राहकांची दिशाभूल करणे हा गुन्हा आहे. जे हॉटेल मालक पारदर्शकता पाळणार नाहीत आणि माहिती लपवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळतील, त्यांचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो. नागरिकांच्या जेवणातील आवडीचा पदार्थ असलेल्या पनीरमध्ये होणारी भेसळ ही चिंतेची बाब आहे. ग्राहकांना आपण काय खातोय हे कळायलाच हवे. यापुढे पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉग विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाचे काय आहेत निर्देश? पनीर आणि चीज ॲनालॉगमधील फरक अन्न सुरक्षा मानके विनियम 2011 नुसार पनीर हा केवळ दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे. तर डेअरी ॲनालॉग हा दूधाव्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून तयार केला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला, तरी पनीर नसून ‘चीज ॲनालॉग’ या प्रवर्गात मोडतो. हॉटेल्स, उपाहारगृहे आणि जलद खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांनी तक्रार कुठे करायची? उत्पादन घेताना ग्राहकांनी दक्षता घ्यावी. दिशाभूल झाल्यास प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर