ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला?:तुमच्या हव्यासापोटी निर्माण वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र ‘उडता पंजाब’ झालाय – राजू शेट्टी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“सत्ता आणि हव्यासापोटी निर्माण झालेल्या वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होऊन ‘उडता पंजाब’ झाला आहे, हे आता मान्य करा. राज्यात अवैध धंद्यांचा महापूर आला असून गल्लीबोळातील बेकायदा व्यवसायांची यादीच मी तुम्हाला पाठवू शकतो,” अशा जळजळीत शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या आमदार निलेश राणे यांचा व्हिडिओ शेअर करत शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राजू शेट्टी यांनी निलेश राणे यांच्या विधानाचा दाखला देत म्हटले की, महाराष्ट्राची वाटचाल उडता पंजाबसारखी झाली आहे. या वाक्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी महाराष्ट्र बदनाम करत असल्याचे वक्तव्य करून त्याला दुजोरा दिला. होय देवाभाऊ तुमच्यासारख्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र बदनाम नव्हे बरबाद होत आहे. तुमच्याच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पोलिस खात्यावर केलेले हे आरोप ऐका. एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस जर दोन ते अडीच कोटीची कमाई करत असतील तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंतर्मुख होवून विचार करा. पोलिसांच्या ‘वसुली’चे दर केले उघड निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पोलिसाची कमाई दोन ते अडीच कोटी असल्याचे म्हटले होते. त्यावरुन शेट्टी यांनी राज्यातील कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांतील वसुलीचा आकडा शेकडो कोटींच्या घरात असल्याचा दावा केला. त्यांनी पोलिसांच्या हप्तेखोरीचे कथित सरासरी दरही सांगितले. मटका अड्डा: १५ ते २५ हजार रुपये प्रति महिना. अवैध दारू विक्री: १० ते १५ हजार रुपये प्रति महिना. अंमली पदार्थ (ड्रग्स): ७५ हजार ते १.५० लाख रुपये प्रति महिना. गांजा विक्री: २५ ते ५० हजार रुपये प्रति महिना. अवैध लॉज व्यवसाय: १० ते १५ हजार रुपये प्रति महिना. याप्रमाणे पोलिसांचे सरासरी दर ठरले असून ज्यांची विक्री व व्यवसाय जास्त आहेत त्यांचे दर तर गगनाला भिडलेले असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. कारवाईपूर्वीच अड्ड्यांना दिली जाते टीप राजू शेट्टी यांनी आरोप केला की, पोलिस ठाण्यातील बीट अंमलदारापासून ते जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा आणि गुप्तचर शाखेच्या निरीक्षकांना सर्व अवैध अड्डे माहित आहेत. “एखाद्या ठिकाणी पोलिस कारवाई करणार असतील, तर त्याआधीच संबंधित मालकांना ‘टीप’ देऊन सावध केले जाते. पोलिसांच्या याच आशीर्वादामुळे अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांनी तरुणाई बरबाद होत आहे,” असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र उडता पंजाब झाल्याचे मान्य करा देवेंद्रजी तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या या “ वसुली “ व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होवून उडतां पंजाब झाला आहे हे मान्य करा. अजून गावनिहाय, शहरनिहाय कोणत्या गल्लीत काय काय अवैद्य व्यवसाय सुरू आहेत याची यादीही पाठवू शकतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर