ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी!:मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी १० जून रोजी ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली होती. १ कोटी ७७ लाख महिला ठरल्या पात्र शासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्यभरातून तब्बल अडीच कोटी महिलांनी अर्ज दाखल केले होते. गेल्या दीड वर्षांपासून या अर्जांची अत्यंत कसून छाननी आणि पडताळणी सुरू होती. शासनाने ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करून लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली. या प्रक्रियेत एप्रिलअखेर राज्यामधील सुमारे १ कोटी ७७ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र, विविध त्रुटी आणि निकषांची पूर्तता न केल्यामुळे जवळपास ७० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. अपात्रतेची प्रमुख कारणे कोणती? अर्जांची छाननी करताना प्रशासनाने अर्जदारांचे उत्पन्न, कुटुंबाची माहिती, इतर शासकीय योजनांचा लाभ आणि रहिवासी पुराव्यांची काटेकोरपणे तपासणी केली. या पडताळणीत समोर आलेली अपात्रतेची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत: खात्यात पैसे आल्याचा मेसेज आला नाही? ‘असे’ करा चेक मे महिन्याचा हप्ता १५ जूनपासून वितरित केला जात असला तरी, तांत्रिक कारणांमुळे किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचा ‘एसएमएस’ प्राप्त झालेला नाही. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर, पात्र लाभार्थ्यांनी मेसेज आला नाही म्हणून घाबरून जाऊ नये. त्याऐवजी, आपल्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲपवरून ‘बँक स्टेटमेंट’ तपासावे किंवा थेट बँकेच्या शाखेत जाऊन आपले पासबुक अपडेट करून घ्यावे. पासबुकच्या नोंदीवरून खात्यात पैसे जमा झाले आहेत किंवा नाही, याची अचूक माहिती मिळू शकेल. निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ मध्ये महायुती सरकारने सुरू केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर महिलांमध्ये मोठा प्रतिसाद मिळालेल्या या योजनेचा विधानसभा निवडणुकीतही महत्त्वाचा प्रभाव पडल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा सत्ता आल्यास लाभाची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपयेच जमा केले जात आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर