ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

नाशिक विधान परिषद निवडणूक:भाजप शहराध्यक्षांनी फोटोसेशनसाठी स्टेअरिंग धरले, नियंत्रण सुटल्याने नगरसेवकांची बस हॉटेलच्या भिंतीला धडकली

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधातील अंतर्गत नाराजी आणि संभाव्य मतफुटी रोखण्यासाठी सर्व नगरसेवकांना ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ अंतर्गत सहलीवर पाठवण्यात आले आहे. मात्र, मतदानापूर्वीच ठाण्यातील भिवंडी येथील एका रिसॉर्टवर एक मोठा अघटित प्रकार घडला. फोटोसेशनच्या अतिउत्साहात भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी बसचे स्टेअरिंग हातात घेतले, मात्र त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस थेट रिसॉर्टच्या भिंतीला जाऊन धडकली. या अपघातात बसचे किरकोळ नुकसान झाले असून, सुदैवाने सर्व नगरसेवक सुखरूप आहेत. भिवंडी येथील हॉटेल परिसरात नगरसेवकांना घेऊन आलेली बस पार्क केली जात असताना हा प्रकार घडला. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी फोटोशूटच्या नादात मूळ चालकाला सीटवरून खाली उतरवले आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसले. त्यांनी बस सुरू करताच गाडीवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि ती थेट हॉटेलच्या आवारातील सुरक्षा भिंतीला जाऊन धडकली. या धडकेमुळे हॉटेल परिसरात काही काळ घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सहलीपूर्वी नाशिकमध्ये रंगले मोठे ‘नाट्य’ या सहलीचे नियोजन करताना महायुतीच्या नेत्यांना स्थानिक पातळीवर नगरसेवकांची मनधरणी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. जोपर्यंत आगामी रणनीती आणि ‘विशेष व्यवस्थेचे’ (लक्ष्मीदर्शन) ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत सहलीला न जाण्याचा हेका अनेक नगरसेवकांनी धरला होता. यामुळे समन्वयक नेत्यांची चांगलीच कोंडी झाली होती. अखेर काही जणांना तात्काळ ‘टोकन’ तर काहींना भक्कम शब्दाचा विडा दिल्यानंतरच सोमवारी (दि. १५) नगरसेवकांचे पथक ठाण्याच्या देशाने रवाना झाले. सहलीला रवाना झालेल्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ भारतीय जनता पक्षाच्या ७२ नगरसेवकांपैकी ६६ जण सहलीवर आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या २६ नगरसेवकांपैकी २५ जण सहलीला आले आहेत. तर ग्रामीण भागातील प्रतिनिधी मात्र अद्याप वेटिंगवर आहेत. उमेदवाराबाबत प्रचंड नाराजी; अंतर्गत बंड रोखण्यासाठी ‘व्हिप’ जारी नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडे साडेचारशेहून अधिक मतांचे स्पष्ट बहुमत असतानाही नेत्यांमध्ये कमालीची धाकधूक पाहायला मिळत आहे. गेल्या वेळी निवडून आल्यानंतर विद्यमान उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मतदारोंकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप असल्याची माहिती समोर येत आहे. नगरसेवकांनी सुरुवातीला “आधी आमचे काय ते बोला, मगच मतदानाचे पाहू” अशी थेट भूमिका घेतली होती. अखेर माजी महापौर हिमगौरी आहेर-आडके, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी मध्यस्थी करत नगरसेवकांना ठाण्याला रवाना केले. तिथे त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र फाटक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोणताही धोका पत्करायचा नसल्याने भाजपने बसमध्ये चढतानाच प्रत्येक नगरसेवकाच्या हातात पक्षाचा अधिकृत ‘व्हिप’ (पक्षादेश) सोपवला असून नरेंद्र दराडे यांनाच मतदान करणे बंधनकारक केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर