महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतःचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणताही पक्ष कितीही मोठा झाला, तरी अखेर त्यांना भाजपच्या पंखाखाली आणि त्यांच्याच सावलीत राहावे लागणार आहे. भाजप त्यांना हवा तेवढा सूर्यप्रकाश कधीच मिळू देणार नाही, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेची भाजपला भीती वाटते, या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सध्याच्या राजकारणात विचारसरणीचा कोणताही संबंध उरलेला नाही. लोक स्वतःची नितीमत्ता विकून पक्षांतरे करत आहेत. देश आणि राज्यातील संपूर्ण राजकारण आता केवळ सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर चालवले जात आहे. गुजरातमध्येच सत्ता-संपत्ती एकवटली विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला केवळ 4 ते 5 टक्के कर देणाऱ्या गुजरात राज्यामध्ये आज देशातील सगळी सत्ता आणि संपत्ती एकवटली असल्याचा आरोप त्यांनी केला. ही अत्यंत गंभीर परिस्थिती असून, आगामी काळात आपल्याला ‘एक देश, एक पक्ष आणि निवडणुकाच गायब’ अशा हुकूमशाही परिस्थितीला सामोरे जावे लागते की काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सरकारचे विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी देशातील तरुण रस्त्यावर उतरला. मात्र, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तुम्ही काहीही करा, आम्ही तुमचे ऐकणार नाही अशी सध्याच्या सरकारची हुकूमशाही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीमुळे देशाचे मोठे नुकसान होत असून, आता सरकारच्या पुढच्या कार्यकाळात काय काय पाहायला मिळते, हेच बघावे लागेल. निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे राज्यातील वीज निर्मितीवर परिणाम राज्यातील वीजटंचाई, वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्याच्या घटना घडल्या. निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे हे संच बंद पडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली. राज्याला पुरविला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, यंदा उन्हाळ्यात वीजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असताना महाजनिर्मितीच्या अनेक वीज निर्मिती संचांमध्ये तांत्रिक बिघाड झाले. यामागे निकृष्ट दर्जाचा कोळसा हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे निकृष्ट कोळसा पुरवठा करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, कोळसा पुरवठ्याबाबत केंद्रीय कोळसा मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली असून कोळशाचे योग्य सॅम्पलिंग करण्याबाबत राज्याची भूमिका मांडण्यात आली आहे. कोळसा पुरवठ्याबाबत जे नवीन टेंडर काढले जाईल त्यात निकृष्ट कोळसा पुरवठा करणारे,जे गैरफायदा घेतात ते घेऊ शकणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. राज्यातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून वीजनिर्मितीसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का,असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.यावर चंद्रपूर येथे ८०० मेगावॉट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. हे ही वृत्त वाचा खासदारांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये:मतदारसंघाचा निधी पडून, मग विकास करायला तिकडे गेलात की कंत्राटं घ्यायला?- संजय राऊत संजय दिना पाटील यांनी काही बोलण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरेंशी भांडण नव्हते तर त्यांनी पक्ष सोडायला नको होता. ज्यांच्याशी त्यांचे भांडण आहे त्यांच्यासंदर्भात मातोश्रीवर येत चर्चा करायला हवी होती. या सर्व गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही. ते हे का सांगत नाहीत की 13 तारखेला त्यांच्याकडे 15 कोटी रुपयांचे खोके आले, त्यानंतर 14 तारखेला पुन्हा 5 कोटी रुपये आले मग मी दिल्लीतील पक्षाच्या बैठकीचा व्हीप धुडकावला आणि गायब झालो त्यानंतर मला उरलेले 35 कोटी रुपये मिळाले हे संजय दिना पाटील यांच्यासह सर्व गद्दारांनी सांगितले पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर पैशांनी विकत घेता येणारे कार्यकर्ते आम्ही नाहीत:पक्षांतराच्या चर्चांदरम्यान खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया, संजय राऊतांबद्दलही मोठं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना परभणीचे खासदार संजय हरिभाऊ जाधव यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतानाच कार्यकर्ते पैशांनी विकत घेता येत नाहीत, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. वाचा सविस्तर
