ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

सेनगाव तालुक्यात वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू:पेरणीपूर्व मशागत करत असताना काळाचा घाला, भानखेडा गावावर शोककळा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे शेतात नांगरणीचे काम करीत असतांना अचानक विज अंगावर पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. 25 रात्री घडली आहे. जगन सिताराम कोटकर (35) असे मयत शेतकऱ्याचे नांव असून या घटनेमुळे भानखेडा गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत महसूल विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भानखेडा येथील जगन कोटकर यांना भानखेडा शिवारात सुमारे दोन एकर शेत आहे. सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु असून दुपारच्या वेळी ऊन्हाचा कडाका असल्याने सायंकाळच्या वेळी काडीकचरा वेचणी व इतर कामे केली जात आहेत. त्यानुसार जगन कोटकर व त्यांच्या सोबत नागोजी कोटकर, रामकिसन कोटकर हे सोमवारी सायंकाळी शेतात कामासाठी गेले होते. शेतात नांगरणीचे काम सुरु केले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरु झाला. यावेळी शेतात काम करीत असलेल्या जगन यांच्या अंगावर विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र सुदैवाने नागोजी व रामकिसन हे दूर अंतरावर असल्याने त्यांना विजेची झळ बसली नाही. या घनटेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनीही महसूल विभागाचे पथक पाठविले तर सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार सुभाष चव्हाण, जीवन मस्के यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, मयत जगन यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भानखेडा गावावर शोककळा पसरली आहे. मयत शेतकरी जगन कोटकर यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर