ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ऑपरेशन टायगरला ठाकरे सेनाच जबाबदार:प्रतापराव जाधवांचा दावा, खासदारांमध्ये असंतोष असल्याचा गौप्यस्फोट

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘ऑपरेशन टायगर’वर केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटत असतील, तर त्याला स्वतः उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि त्यांचे नेतृत्वच जबाबदार आहे,” असा थेट आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड असंतोष धुमसत असल्याचा दावाही त्यांनी केला. नेत्यांना संशयाच्या नजरेने पाहतात- जाधवांचा घणाघात संजय राऊत यांनी मध्यरात्री केलेल्या 15 कोटींच्या ॲडव्हान्स’च्या आरोपांना उत्तर देताना प्रतापराव जाधव म्हणाले की, मूळ समस्या ही खासदारांबद्दलच्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनात आहे. तिथल्या लोकप्रतिनिधींना वारंवार संशयाच्या नजरेने पाहिले जाते. कुणाशी बोलायचे, कुणाला भेटायचे आणि कुणाच्या घरी जेवायला जायचे, यावरही पाबंद्या घातल्या जातात. या अशा जाचाला खासदार आता पूर्णपणे कंटाळले आहेत आणि त्यांच्यातील असंतोष कधीही बाहेर पडू शकतो. ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात! जाधव यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन टायगर’ हे काही बाहेरून लादलेले नाही, तर ते स्वतः ठाकरे गटाच्या अंतर्गत कारभारामुळेच पुढे जात आहे. पक्ष नेतृत्वाकडून वारंवार “ज्यांना राहायचे आहे त्यांनी राहा, ज्यांना जायचे आहे ते जाऊ शकतात” अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात, ज्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या दिवशी मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन अधिकृतपणे पूर्ण होईल, असा पुनरुच्चार करत त्यांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे. ठाकरे गटाचे ५ ते ६ खासदार दिल्लीत तळ ठोकून असल्याच्या बातम्यांदरम्यान प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरणात आणखी मोठी ठिणगी पडली आहे. उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर सहा खासदार दिल्लीत दाखल:आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार, उपमुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत
महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण उद्धवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र देऊ शकतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर