ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अकोटमधील जिल्हा परिषद शाळा परिसर बनला समाजकंटकांचा अड्डा:विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडसर, आरोग्याचा प्रश्न गंभीर‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोणे एकेकाळी अकोट शहराची शैक्षणिक क्षेत्रात अधिकारी घडवणारी शाळा म्हणून ‘जहागीरदार’ जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा नावलौकिक होते. मात्र आज याच शाळेच्या आवाराची कमालीची दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक शाळेच्या आवाराचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या या शाळा परिसरात वाढलेली रानटी काटेरी झुडुपे, सर्वत्र साचलेला कचरा, प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्यांचे ढीग, दारूच्या बाटल्या व मिळेल त्या जागेवर केलेली लघुशंका व घाण. यामुळे शाळेला उकीरड्याचे स्वरूप आले आहे. जिल्हा परिषद मराठी व उर्दू माध्यमाच्या या माध्यमिक शाळेला शहराच्या मध्यभागी खूप मोठे आवार आहे. वास्तविक या भव्य मैदानाची क्रीडांगण म्हणून निर्मिती करून विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र, विकास तर दूरच, या मैदानाचा उपयोग आता सार्वजनिक खुले शौचालय म्हणून होत आहे. स्थानिक नागरिक व बाजारातील दुकानदार रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास येथे उघड्यावर शौचास बसतात. दिवसभर येणारे-जाणारे नागरिक येथे राजरोसपणे लघुशंका करतात. यामुळे संपूर्ण शाळा परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विद्यार्थी व शिक्षकांना नाक दाबून वर्गात बसावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यापूर्वी या जिल्हा परिषद शाळेला सुरक्षित संरक्षक भिंत होती. मात्र, परिसरात अतिक्रमणधारकांनी ही भिंत पाडून टाकली. आता याच तुटलेल्या भिंतींमधून आजूबाजूचे नागरिक व टवाळखोर थेट शाळेच्या आवारात ये-जा करतात. रात्री शाळेच्या संरक्षणासाठी एकही चौकीदार नाही. त्यामुळे समाजकंटकांना रात्रीच्या वेळी हुल्लडबाजी करण्यासाठी पूर्णपणे रान मोकळे मिळाले आहे. वर्गखोल्यांच्या खिडक्यांजवळ रानटी वनस्पती, वेली, बाभळीची झाडे वाढली आहेत. या वाढलेल्या झाडाझुडपांमुळे वर्गांमध्ये येणारा नैसर्गिक उजेड व हवा पूर्णपणे बंद झाली आहे. दिवसाढवळ्या वर्गखोल्यांत अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यंच्या दृष्टिने प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. ज्या आवारात ही दुरवस्था झाली आहे, त्याच परिसरात गटशिक्षणाधिकारी यांचे मुख्य कार्यालय व तालुका संसाधन केंद्र आहे. तसेच राज्य मंडळाच्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळी अत्यंत गोपनीय व महत्त्वाचे असणारे ‘कस्टडीयन कार्यालय’ देखील याच ठिकाणी आहे. सर्व शाळांच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण, उत्तरपत्रिकांचे संकलन याच संवेदनशील आवारातून केले जाते. जलसंपदा विभागाचे ‘सहाय्यक अभियंता श्रेणी-१, लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्र. ७, अकोट’ यांचेही शासकीय कार्यालय आहे. दोन-दोन महत्त्वाच्या शासकीय यंत्रणा डोळ्यांदेखत असतानाही शाळेच्या या दुरवस्थेकडे डोळेझाक होत आहे. आवारात गटशिक्षणाधिकारी कार्यालय, तरीही प्रशासन सुस्त वरिष्ठांना माहिती दिली ^जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेडसावणाऱ्या समस्या, टवाळखोरांचा त्रास व तुटलेल्या संरक्षक भींतीबाबत अनेकदा वरिष्ठ कार्यालय व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस कारवाई आली नाही. वरिष्ठांनी आतातरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने विचार करून निर्णय घ्यावा. – फिरोज खान, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, अकोट.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर