ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

माउलीचा गजर:भक्ती रंगाची उधळण करत भक्तांचा राजा निघाला माउलीच्या भेटीसाठी पंढरी

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आमुची मिरासी पंढरी| आमुचे घर भिमातीरी|| पांडुरंग आमुचा पिता| रखुमाई आमुची माता|| अशा सर्व संतांचे माहेर असलेले पंढरपूर वारीकरिता सदगुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे जेष्ठ शुद्ध द्वादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून टाळ, मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले, गोकर्णाबाई अवचार, शोभा देवतळे यांच्या हस्ते पहाटे श्रींचा अभिषेक झाला. सकाळी प्रस्थानाचे कीर्तन, श्रींच्या रजत मुखवटा व पादुकांचा अभिषेक, महाप्रसाद घेऊन दुपारी एक वाजता श्रींचा पालखी सोहळा निघाला. पालखी मार्गाने ज्ञानोबा तुकाराम, ॐ वासुदेव नमो नमः तथा अनेक संतांच्या अभंग गायन भजनानंदात पालखी सोहळा मार्गस्थ झाला. अकोटवासीयांनी ठिकठिकाणी सडा, रांगोळ्या, पुष्पवृष्टी करून गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे श्रद्धापूर्वक स्वागत केले. हरिनामाच्या गजराने अकोटनगरी दुमदुमली होती. पताकाधारी दिंडीच्या मागे स्वानंद सुख निवासी सदगुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी देवाची उपशाखा असलेल्या श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र श्रद्धासागर, कोट येथील सर्व विद्यार्थी वारकरी पोशाखामध्ये पावल्या व अभंग गायन करतांना बघून आकोटचे वैभव वृद्धिंगत होत असल्याच्या भावना भाविकांमध्ये व्यक्त झाल्या. पालखी सोहळा प्रस्थान प्रसंगी संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांचे कीर्तन झाले. विश्वस्त मंडळाचे महादेवराव ठाकरे, पुरुषोत्तम लाजूरकर, रवींद्र वानखडे, मोहनराव जायले, अविनाश गावंडे, डॉ. अशोकराव बिहाडे, सुनंदा आमले, जयदीप सोनखासकर, गजाननराव चोपडे, अशोकराव पाचडे, नंदकिशोर हिंगणकर, पुरुषोत्तम मोहोकार, शिरीष ढवळे, अनिल कोरपे, केशवप्रसाद राठी, गजाननराव दुधाट, दिंडी व्यवस्थापक अंबादास महाराज मानकर आदी उपस्थित होते. श्रींच्या पालखी सोहळ्याचे क्षेत्र श्रद्धासागर येथे हरिओम ठाकरे‌ राजूरा, ललितादेवी अग्रवाल (रिधोरा) यांनी वारकऱ्यांना महाप्रसादाची सेवा अर्पण केली. पालखी मार्गावर सुभाष अंबाळकर, हनुमान मुरकुटे, डॉ. सुनील पांडे, सुशील पुंडकर, नंदूभाऊ जांभुळकर, पुरुषोत्तम लाजूरकर, अविनाश सावरकर, सूरज वाघ, संजय गावंडे, बिट्टू पाचडे, डॉ. सुहास कुलट, दिलीप बोचे, श्री संत वासुदेव महाराज निवासस्थान, राम पारवाणी, निशांत पतसंस्था, पुष्पांजली मंगल कार्यालय, पंकज कुलट आदी भक्तांनी ठिकठिकाणी चहा, फराळ, फळ, शीतपेय, आम्ररस इत्यादी अर्पण करून वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री दत्त मंदिर, कोला रोड येथे गजानन जायले यांच्याकडे महाप्रसाद व रात्रीचा मुक्काम होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर