ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ठाकरे गटाच्या नेत्याने खासदारांना शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट काल झाला:खासदारांबद्दल एकनाथ शिंदे निर्णय घेतील- संजय शिरसाट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काल ठाकरेंच्या एका नेत्याने 6 खासदारांना शिवीगाळ केली त्यांचा परिणाम आज त्यांना जाणवले. त्यांना त्या पक्षात राहायचे नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे. म्हणून यापुढे ते 6 खासदार काय निर्णय घेतात यावर सर्व काही ठरणार आहे, त्यांना कारवाईच्या नोटीसा दिल्या जातील, पण 6 खासदार त्याला एकत्रित समोर जातील, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे हे शेवटच्या क्षणाना फोन करतात. त्यांचा तो स्वभावच आहे. पाणी वाहून गेल्यावर मनधरणी करण्यात काही अर्थ नाही हे उद्धव ठाकरेंना आधीच समजले होते. ऑपरेशन टायगर आम्ही केलेले नाही. ते खासदार नाराज होते, त्यांनी निर्णय घेतला. त्या खासदारांनी कुठे जायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. गद्दार, खोके अशी टीका ठाकरे गट करेल त्यांचे ठरलेली वाक्ये आहेत. विधान परिषदेच्या सर्व जागा आम्हीच जिंकणार संजय शिरसाट म्हणाले की, विधान परिषदेच्या सर्वच जागा महायुतीच जिंकणार आहे. महायुतीसोबतच इतर मतदारसुद्धा आमच्या उमेदवारांना मतदान करणार आहे. जे जिंकले त्यांच्यावर आरोप करणे हेच हरलेल्या व्यक्तीचे काम आहे. विधान परिषद निवडणुकीत मविआतील तिन्ही पक्ष एकत्र नसल्याने त्यांचा पराभव निश्चित झालेला होता. कोणत्याच मतदारसंघात त्यांची एकजूट दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी पराभवावे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा प्रयत्न करू नये. मविआ अस्तित्वात राहिली नाही हे त्यांनी आता मान्य केले पाहिजे.
ठाकरे गटाकडे दुसरा काही पर्याय नाही ठाकरे गटाचे नेते 6 खासदारांची मनधरणी करत आहेत की पक्षातून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे हेच कळत नाही. आता जे काही होईल ते उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय ठाकरे गटाकडे दुसरा काही पर्याय नाही. त्यांचे वक्तव्य पाहिले तर लोकं जात आहेत त्यांचे गांभीर्य नाही,असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्या घरी जा त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येते, रोज अनेक पक्षप्रवेश होत असतात. कधी-कधी पक्षप्रवेश करण्यासाठी वेळ अपुरा पडतो. ऑपरेशन टायगरचा आणि आमचा काही संबंध नव्हता. त्यांच्या पक्षातील अंतर्गत वादाचा हा विषय होता. अनेक वर्षे खासदार असणाऱ्या लोकांना योग्य वागणूक दिली जात नव्हती हे त्यांनी पक्ष नेत्यांना सांगितले होते. पत्रकार परिषदेत त्यांना शिव्या देण्याचा प्रकार काल आपण सर्वांनी पाहिला. हे फार पूर्वीपासून सुरू आहे. त्याचा स्फोट काल झाला. कार्यकर्ते तुमचेच डोकं फोडतील संजय शिरसाट म्हणाले की, आता राडे करण्यासाठी तुम्ही दिल्लीतून निघाले तर पाहिजे. आता काय कार्यकर्त्यांना डोकं फोडायला लावता का? ते वैतागले आहेत ते तुमचेच डोकं फोडतील. तुमच्या हातात कुलूप आहे ते पक्षाला कधी लावायचे हे ठरवा. कोणी पक्ष संपवला हे लोकं सांगत आहेत. याच लोकांमुळे पक्षाची ही अवस्था झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंना मराठवाडा आवडत होता. तो टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकं यांना आता पायाखाली तुडवतील. शरद पवारांचा गट कुठे आहे? हे पांढऱ्या पायाचे लोकं आहे जिथे जातील तिथे सर्व बदबाद करतील. आम्ही घडामोडींवर तटस्थ! संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटाची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सर्व माहिती आपल्यासमेार येणार आहे. आम्ही या सर्व घडामोडीकडे तटस्थपणे पाहत आहोत. दिल्लीमध्ये काय घडले याची काही माहिती नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे कोणी किती सह्याचे निवेदन दिले याबद्दल आम्हाला माहिती नाही. जे काही होईल ते एक तासाभरात सर्वांनाच समजेल. की कोण बैठकीला उपस्थित राहिले आणि ओम बिर्ला यांनी कोणाच्या गटाला मान्यता दिली आहे का नाही. सर्व काही लवकरच समजेल संजय शिरसाट म्हणाले की, 12 वाजेपर्यंत ही सर्व गोष्ट स्पष्ट होईल. जे खासदारांबद्दल बोलले जात आहे त्या खासदारांना सुद्धा कायदेशीर सर्व गोष्टी माहिती असेलच ना. कायदा केवळ ठाकरे गटालाच कळतो असे नाही. जे होईल त्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असेल म्हणून खासदार जे निर्णय घ्यायचा तो घेईल. आता पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू- संजय राऊत आमच्या पक्षाचे खासदार-आमदार तोडणार असे म्हणणाऱ्या लोकांना वाटते एकदा पक्षाचे दोन तुकडे केले आता पुन्हा करू. त्यांना मी सांगतो आता जर पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणून घेणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तुम्ही यंत्रणेची धमकी कोणाला देत आहात? आम्ही कारागृहात जाऊन आलो आहोत, पु्न्हा जाण्यासाठी तयार आहे. पण तुम्हाला धडा शिकवून जेलमध्ये जाईल. आमचाच पक्ष मुळ शिवसेना आहे, शिंदेंचा गट आहे. जे दावा करतात आमचे खासदार फुटले त्यांनी ते सिद्ध केले पाहिजे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर