ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शिबिरात विद्यार्थ्यांनी दिला “एकमेका साहाय्य करू अवघे सुपंथ’चा संदेश:खेंडकर विद्यालयात पार पडले शिबिर; खेळांत दाखवले काैशल्य‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सरस्वती नगर वाशीम बायपासवरील खेंडकर विद्यालयात एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिस्तप्रियतेचा संदेश देत विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले. अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नीलेश खेंडकर होते. शिबिराचे उद्घाटन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर यांनी केले. शिबिरात सकाळच्या सत्रात ध्वजारोहण व गीत गायन स्पर्धेचे आयोजन पाचवी ते सातवी तसेच आठवी ते दहावीच्या वर्गापर्यंत करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत, शालेय जीवनावर आधारित गीते सादर करून विद्यार्थी व पालकांना मंत्रमुग्ध केले. स्काऊट विद्यार्थी हा नेहमी धैर्यवान, निष्ठावान असतो. स्काऊट नेहमी आपल्या सहकार्याला मदत करतो. एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हा संदेश देऊन आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावावा, असा संदेश देण्यात आला. सूत्रसंचालन कांचन सिरसाट यांनी केले. आभार गोपाल वानखडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक आशा हिवरकर, सुरेश सुरत्ने, श्रीकांत पागृत, गोपाल वानखडे, प्रशांत काळे, उषा जगदाळे, अंजू मुंढे, मीना घाटोडे, स्वाती धोटे, अश्विनी सोळंके, सुकेशनी ओहेकर, छाया इंगळे, वर्षा मते, मेघा शर्मा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नियम सर्वांसाठी सारखेच स्काऊटच्या नियमामुळे आपल्याला शिस्त शिकायला मिळते. नियम सर्वांसाठी असतात त्याचे पालन सर्वांनी करणे म्हणजे शिस्तप्रियता होय, असे प्रतिपादन उद्घाटक मुख्याध्यापक नीलेश खेंडकर यांनी केले. स्काऊटच्या नियमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी एक शिस्त निर्माण होते. त्यामुळे स्काऊटचे पालन विद्यार्थी, सर्वांनी हे शाळेमध्ये केलेच पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व. यमुनाबाई खेंडकर मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मेणबत्ती पेटवणे, फुगे फुगवणे, बटाटा शर्यत, निंबू चमचा आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. दुपारच्या सत्रात शेकोटी कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेकोटी पेटवण्यात आली. शेकोटी कार्यक्रमानंतर विविध फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये वर्ग ५ ते ७ तसेच ८ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भाजीवाली, फळ विक्रेता, डॉक्टर, इंजिनिअर इत्यादी वेशभूषा साकारून उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर