ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

पुण्यात ‘शिवशाही पॅलेस’ हॉटेलवर गुन्हे शाखेचा छापा:वेश्या व्यवसायातून महिलेची सुटका, चालक-मालकावर गुन्हा दाखल

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-7 ने खराडी येथील ‘हॉटेल शिवशाही पॅलेस’वर छापा टाकून हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, लॉज चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील डाऊन टाऊन रोडवरील पराशर हौसिंग सोसायटीमध्ये असलेल्या ‘हॉटेल शिवशाही पॅलेस’मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती युनिट-7 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांना मिळाली होती. एजंट मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप चॅटद्वारे ग्राहकांशी संपर्क साधून मुली पुरवत असल्याचे समोर आले होते. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक आणि पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळताच पोलिसांनी हॉटेल शिवशाही पॅलेसवर छापा टाकला. या कारवाईत वेश्या व्यवसायाच्या विळख्यातून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. तसेच, घटनास्थळावरून रोख रकमेसह एकूण 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी लॉज चालक रोहित छोटूराम पटेल (वय 20, रा. खराडी, पुणे) आणि लॉज मालक रामचंद्र बळीराम पांडुळे (वय 31, रा. राजाराम पाटील नगर, खराडी) तसेच एका एजंटविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 143, 223, 3(5) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी खराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उप आयुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे व युनिट-7 च्या पोलिस पथकाने केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर