ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

‘आगे आगे देखो होता है क्या!’:ठाकरेंच्या 6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार? शिवसेनेचे संतोष बांगर, बच्चू कडू ते शंभूराज देसाईंचा दावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील तब्बल 13 ते 14 आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर आता ‘ऑपरेशन टायगर 2.0’ची चर्चा सुरू झाली असून, बांगर यांच्या विधानामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार फुटणार असल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ‘सारे आमदार आमचे मित्र आहेत. त्यांच्या मनातील खदखद ते व्यक्त करतात. ते सुद्धा आमच्यासोबत येतील,’ असा दावा त्यांनी केला. सोबतच बच्चू कडू यांनीही “ठाकरे गटाचे खासदार आल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ आमदारही येणारच आहेत. त्या बाबतीत शिंदे साहेबांचं नियोजन एकदम व्यवस्थित आणि करेक्ट असतं. बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत,” असे म्हणत त्यावर शिक्कामोर्तब केले. ‘सहा महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं’ हिंगोलीत माध्यमांशी बोलताना संतोष बांगर म्हणाले, “सहा महिन्यांपूर्वीच मी सांगितलं होतं की काही खासदार शिवसेनेत येतील. आज ते वास्तवात घडलं आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सहाही खासदार आमच्यासोबत आले आहेत.” हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी हा पक्षाच्या विस्ताराचा टप्पा असल्याचे म्हटले. ’13 ते 14 आमदारही येणार’ यावेळी पत्रकारांनी ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार का, असा प्रश्न विचारला असता संतोष बांगर यांनी थेट संकेत दिले. “आगे आगे देखो होता है क्या… तुम्ही जे बोलत आहात तेही झाल्याशिवाय राहणार नाही.” यानंतर त्यांनी दावा केला की, “उबाठा गटातील 13 ते 14 आमदार आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील.” त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. ‘बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आमचीच’ संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा विचारधारेचा मुद्दा पुढे करत म्हटले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. शिंदे साहेब हिंदुत्वाच्या विचारांवर महाराष्ट्राला पुढे नेत आहेत.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि जनतेतील प्रतिसादातही शिंदे गटाला पाठिंबा वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला. हिंगोलीत नागेश आष्टीकरांच्या स्वागताचे बॅनर दरम्यान, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात संतोष बांगर यांच्या वतीने मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर, “हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याबद्दल खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे अभिनंदन” असा मजकूर झळकत आहे. यामुळे बंडखोर खासदारांच्या निर्णयाला शिंदे गटाकडून उघड समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे. ‘ऑपरेशन टायगर’मध्ये कोणते खासदार सहभागी? राजकीय वर्तुळात सध्या खालील सहा खासदारांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याची चर्चा आहे: या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाबाबत पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंसोबत उभे राहिलेले तीन खासदार या मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत तीन खासदार ठामपणे उभे असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये अरविंद सावंत] अनिल देसाई, राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. दिल्लीत झालेल्या संसदीय बैठकीलाही हे तिन्ही खासदार उपस्थित होते. खासदारांनंतर आमदारांची फूट पडणार? 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली होती. त्यानंतर आता लोकसभेतील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अशातच संतोष बांगर यांनी केलेला “13 ते 14 आमदारही आमच्यासोबत येतील” हा दावा खरा ठरतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण जर हा दावा वास्तवात उतरला, तर ‘ऑपरेशन टायगर’चा पुढचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठा भूकंप घडवू शकतो. ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा अंक!:6 खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या गळाला? बच्चू कडूंचा मोठा दावा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने उलथापालथ सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (उबाठा) तब्बल सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर, आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे…वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर