ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

बहुमत असूनही भाजपा नगरसेवक ‘अज्ञातस्थळी’ रवाना:भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची भीती

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही, मतदानापूर्वीच भाजपाच्या नगरसेवकांना ‘अज्ञातस्थळी’ पाठवण्यात आले आहे. यामुळे महायुतीला क्रॉस व्होटिंगची भीती सतावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप जिल्हा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ब्राह्मणकर यांच्या उमेदवारीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी आणि धुसफूस समोर आली आहे. पक्षीय बलाबलानुसार, भंडारा जिल्ह्यात भाजपाकडे ८५ तर काँग्रेसकडे ४५ मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्यात भाजपाकडे ८० तर काँग्रेसकडे ६१ मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेची निवडणूक सात वर्षांपासून झाली नसल्याने, तेथील नगरसेवकांना या मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे, ज्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. महायुतीमधील अंतर्गत नाराजी आणि शिवसेनेची उघड भूमिका लक्षात घेता, काँग्रेसने मोठी मोर्चेबांधणी केली आहे. महायुतीला शह देण्यासाठी काँग्रेसने ‘१ विरुद्ध ३’ असा फॉर्म्युला तयार केला आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केला आहे, तर त्यांना पाठिंबा देत काँग्रेस समर्थित प्रफुल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. काँग्रेसच्या या रणनीतीमुळे आणि बंडखोरीच्या शक्यतेमुळे महायुतीमध्ये अस्वस्थता आहे. स्पष्ट बहुमत असूनही, विरोधकांच्या या डावपेचांमुळे ही निवडणूक आता केवळ संख्याबळावर राहिलेली नाही. भंडारा-गोंदियाच्या या राजकीय लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर