ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

संभाजीनगरात अल्पवयीन मुलीशी मैत्री करत अत्याचार:आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकीही, आरोपी वेटर काम करणारे, दोन दिवसांची पोलिस कोठडी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत पैशांची मागणी केली. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात किशोर विलास साळुंके (20), कृष्णा अवचितराव सोळुंके (25, दोघेही चिमणापूर, ता. कन्नड) यांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली. पीडित मुलीच्या नातेवाईक महिलेला एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. “तुमच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो माझ्याकडे असून, वीस हजार रुपये न दिल्यास ते व्हायरल करू,’ अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली.
गुंगीचे औषध देऊन अत्याचार अल्पवयीन मुलीची एका तरुणाशी ओळख झाली होती. त्या तरुणाने त्याचा मित्र किशोर सोळुंके याचा मोबाइल नंबर पीडितेला दिला. त्यानंतर किशोर आणि पीडितेची ओळख झाली. 1 जून रोजी रात्री किशोरने त्याच्या मित्राच्या मोबाइलवरून पीडितेला फोन करून टीव्ही सेंटरला भेटायला बोलावले. तेथून त्याने तिला खोलीवर नेले. तेथे पीडितेने नकार दिला असतानाही तिला जबरदस्तीने गुंगीचे औषध पाजले. पीडिता बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर अत्याचार केले. कपडे उलटे असल्याने खात्री सकाळी शुद्ध आल्यावर ती जालना रोडवर होती. त्या मधल्या काळात काय झाले यातील तिला काही आठवत नव्हते. तिने आरोपीला फोन करून विचारले, मात्र त्याने सर्व आलबेल असल्याप्रमाणे उत्तर देत घरी सोडल्याचे सांगितले. पीडित मुलगी घरी गेल्यावर तिच्या अंगावर असलेले सर्व कपडे उलटे घातलेले होते, तिला वेदना होत असल्याने तिला चुकीचे घडल्याची खात्री झाली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर