ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

उपजिल्हा रुग्णालय मोर्शीत जागतिक ‘सिकलसेल’ जागरूकता दिन साजरा:वेळेवर वैद्यकीय उपचार घेत त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन, मान्यवरांची उपस्थिती‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दरवर्षी १९ जून हा दिवस जगभरात जागतिक सिकलसेल जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २००८ मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केला. सिकलसेल हा एक गंभीर अनुवंशिक आजार असून रक्ताशी संबंधित आजार आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. वर्ष २०२६ ची अधिकृत जागतिक थीम “सिकलसेल माहिती वाढवा,कलंक दूर करा, काळजी सुधारा’ उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे हा दिवस वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी सिकलसेल रुग्णांची इतर रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी डॉ. प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक यांनी रुग्णांना सिकलसेल विषयी माहिती सांगून दोन्ही जोडीदार सिकलसेल वाहक असल्यास मुलांमध्ये हा आजार पसरण्याचा धोका शंभर टक्के असतो तसेच लग्न पूर्व कुंडली ऐवजी रक्त कुंडली तपासने आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपण या आजारावर मात करू शकतो असे, मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पाटील सिकलसेल वैज्ञानिक अधिकारी यांनी केले. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी विनय शेलुरे, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे, अमोल झाडे, आशिष नेरकर, सुजित वानखडे, नंदू थोरात हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर