ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शरद अन् अजित पवार भाजपला उल्लू बनवत आहेत:प्रकाश आंबेडकर यांचा दावा; सत्तेसाठी तत्त्वांचे राजकारण बाजूला पडत असल्याची खंत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद व अजित पवार एकच असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार व त्यांचे पुतणे अजित पवार एकच आहेत. ते सत्तेसाठी फक्त भाजपला उल्लू बनवत आहेत. सत्तेसाठी तत्वे बाजूला ठेवून वागत आहेत, असे ते म्हणालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या सत्ताधारी महायुतीसोबत आहे. तर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा दुसरा गट सध्या विरोधी बाकावरील महाविकास आघाडीसोबत आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकाविरोधात टीकाटिप्पणी कर असले तरी त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी युती केली आहे. त्यांच्या युतीविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना प्रकाश आंबेडकरांनी दोन्ही पवार एकच असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर सोलापूर येथील आपल्या सभेत बोलताना म्हणाले, दोन्ही पवार एकच आहेत. त्यांनी भाजपला उल्लू बनवले आहे. चौकशीचे ससेमिरा मागे लागला म्हणून एक जण भाजपसोबत गेला. स्वतःची चौकशी थांबवली. आता एकजण डोळे दाखवत असताना दुसरा तुझी 70 हजार कोटींची फाईल पेंडिग असल्याची आठवण काढून देत आहे. आमचा भाजपला प्रश्न आहे, तुम्ही एवढे दिवस ही फाईल का दाबून ठेवली? याचा खुलासा करा. जर फेव्हरेबल असतील तर युती झाली पाहिजे. पण पुण्यात व ठाण्यात युती नाही. याचा राजकीय अर्त असा काढतोय की, भाजपला दोन्ही पक्षांना (शिवसेना व राष्ट्रवादी) संपवायचे आहे. म्हणून त्यांनी त्याला वाऱ्यावर सोडले आहे. विरोधी पक्षाची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तो किती यशस्वी होईल याविषयी साशंकता आहे. अभद्र युती करणाऱ्यांना सतेतून बेदखल करा आंबेडकर म्हणाले, मी मागच्यावेळी म्हटले होते की, तुम्हाला भविष्यात अभद्र युत्या पहावयास मिळतील. त्यानुसार अकोटमध्ये भाजप व एमआयएमची युती झाली. भाजपने सत्तेसाठी तत्त्व सोडले. तर एमआयएमने आरएसएस विरोध सोडला. काँग्रेसनेही अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती केली. आता पक्ष व विचार महत्त्वाचा नाही. सत्तेतून मिळणारे टेंडर महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे लोकांनी अभद्र युतीची सरकारने दूर ठेवली पाहिजेत. काँग्रेस व वंचित हे दोन्ही पक्ष सेक्युलर आहेत. त्यामुळे आम्ही मुंबईत युती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोटच्या प्रकरणात कारवाई करण्याचा इशारा दिला. पण 24 तास झाले तरी त्यावर काहीही झाले नाही. एकीकडे देशावर संकट आले आहे आणि दुसरीकडे देश चालवणारे अनैतिक पद्धतीने सत्तेत येत आहेत. मतदारांना माझे एवढेच सांगणे आहे की, अनैतिक चालणारे, पाकीट वाटणारे आता बाजूला ठेवा. ते बाजूला गेले तरच शहराचे प्रश्न सुटतील. परिवाहन, चादर सारखे अनेक प्रश्न सोलापुरात आहेत. पण त्याची आखणी झाली नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रणिती शिंदे लवकरच भाजपमध्ये जाणार सुजात आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. प्रकाश आंबेडकरांनी सुजात यांच्या दाव्याचे जोरदार समर्थन केले. सुजात आंबेडकर जे बोलले ते योग्यच आहे. ते खरेच बोललेत. तुम्हाला लवकरच त्याची प्रचिती येईल. कुणाच्या रक्तात किती भाजप आहे हे सर्वांना दिसत आहे. कोण किती एकनिष्ठ आहे हे लवकरच दिसून येईल. पण सध्या महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्याचा अतोनात प्रयत्न केला. मल्ला शिदे नावाच्या व्यक्तीला मारहाण करून त्याच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला. यामुळे आमचे निम्मे उमेदवार फॉर्म भरायला आले नाही, असे आंबेडकरांनी यावेळी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर