ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

राजेराय मठात प्रवच‌न, भारुडासह अखंड हरिनाम सप्ताह:विविध स्पर्धांची रेलचेल, अक्कलकोटमध्ये सद्गुरु बेलानाथ महाराजांचा 23 वा पुण्यतिथी उत्सव‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील श्री स्वामी समर्थ राजेरायमठ सद्गुरु बेलानाथ महाराजांचा २३ वा पुण्यतिथी उत्सव दि. ९ जून ते १७ जून दरम्यान भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सप्ताहभर अखंड नाम विना सप्ताह, धर्म संकीर्तन तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त संत श्री ज्ञानेश्वर वारकरी मंडळ श्रीरामपूर यांच्या सहयोगाने भाऊ राऊत, संगीताताई शेजुळ यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज श्री साई सच्चरित ग्रंथाच्या पारायण आणि सायंकाळी ४ पासून प्रवचन, कीर्तन, भारुड, हरिपाठ इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच दररोज संध्याकाळी ७ ते १० दरम्यान व्यंकटेश संगीत विद्यालय सोलापूर, स्वरधास्त संगीत विद्यालय सोलापूर, गुरुकुंज आश्रम मोझरीचे सचिन महाराज भुरले, डॉ. अतुल थोरो (कोल्हापूर), सप्तसूर पुणे, वंदना मांडवकर, माधवी देसाई (पुणे) व मिलिंद चव्हाण यांच्या वतीने भावगीत, भक्तिगीत, प्रवचन आणि कीर्तन आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. दि. २० मे ते १४ पर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरिता छंद कलाशिक्षक अतुल जाधव व बेला चेस अकॅडेमीचे नमित झिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य उत्सव दि. १६ जून रोजी सकाळी ६ वाजता मठाचे उपाध्यक्ष विकास दोडके, पार्वती अम्मा जयदेव, शैला अनंतराज, विनय कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीत श्रींची पूजा करून सुरू झाला. सकाळी १० वाजता डॉ. बालाजी गाजूल, ज्योती झिपरे, सुजाता दोडके, शैलेश मुळे, विजयकुमार गाजुल, ज्ञानेश्वर गाजूल यांच्या उपस्थितीत सामुदायिक अभिषेक करण्यात आला. या रॅलीमध्ये वयोवृद्ध व्यक्तीपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत दोनशे जणांनी सहभाग नोंदवून गावात वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिक कचरा, ध्वनी प्रदूषण इत्यादीवर प्रबोधन करीत फेरी काढली. दि. १४ जून रोजी बेला फाउंडेशनच्या सहकार्याने सकाळी चित्रकला व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन अभिजीत मुळे व हिमाणी मुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून खुल्या गटातील व्यक्तीपर्यंत जवळपास दीडशे स्पर्धक सहभागी झाले होते. सर्व विजेत्यांना सुमन झिपरे, निलाताई सामंत, सरोजाताई सामंत, लीनाताई सामंत, उषा साठे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. सायंकाळी ५ वाजता मठ परिसरात पालखी प्रदक्षिणा झाली. त्यानंतर सहा वाजता बिरलिंगेश्वर ढोल पथक मादन हिप्परगा, चीट हलगी पथक (दक्षिण सोलापूर), न्यू दावलं बँड पथक अक्कलकोट, जय हनुमान भजनी मंडळ हसापूर, संत ज्ञानेश्वर वारकरी भजनी मंडळ (श्रीरामपूर) व भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये राजेराय मठापासून गावातून रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भक्तगणांच्या वतीने जागोजागी रथाची आरती करून स्वागत करण्यात आले. उत्सवाची सांगता दि. १७ जून रोजी बेला समर्थ महिला भजनी मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आली. सामाजिक अन् सांस्कृतिक उपक्रम उत्साहात साजरे गाजूल यांच्या उपस्थितीत सामुदायिक अभिषेक

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर