ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

RSSच्या कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण देताना मोहन भागवतांकडून बायबलमधील संदर्भ:म्हणाले – संघ कोणाला नष्ट करण्यासाठी नाही, तर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी!

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित ‘संघ प्रवासाची १०० वर्षे: नवी क्षितिजे’ या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, राजकारण आणि हिंदू धर्मावर अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण भाष्य केले. “बायबलमध्ये एक वाक्य आहे, जे संघाच्या बाबतीतही तंतोतंत लागू पडते – ‘संघ हॅज कम टू फुलफिल, नॉट टू डिस्ट्रॉय’ (संघ पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आला आहे, नष्ट करण्यासाठी नाही). सर्व चांगल्या कामांची पूर्णता ज्या माध्यमातून होईल, ते कार्य करण्याची संघाची कार्यपद्धती आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भाजप आणि संघातील फरक स्पष्ट अनेकदा भाजप आणि संघ यांना एकच मानले जाते, त्यावर डॉ. भागवत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “अनेक लोक म्हणतात की नरेंद्र भाई प्रधानमंत्री आहेत म्हणजे आर.एस.एस. आहे. ते प्रधानमंत्री आहेत, पण त्यांचा ‘भाजप’ हा राजकीय पक्ष वेगळा आहे. तो पक्ष संघाचा नाही. भाजपमध्ये अनेक स्वयंसेवक आहेत आणि ते प्रभावी देखील आहेत. मात्र, समाज संघटित करण्याचे कार्य इतके व्यापक आहे की, ते झोकून देऊन करावे लागते. हे काम करणाऱ्याला इतर कोणत्याही कामासाठी सवड उरत नाही.” संघाला लोकप्रियता आणि सत्ता नको “संघाला कोणाशी स्पर्धा करायची नाही किंवा लोकप्रियता आणि सत्ताही नको आहे. केवळ देशाच्या भल्यासाठी होणारी सर्व कामे व्यवस्थित व्हावीत, यासाठी संघ आपुलकीच्या भावनेने कार्य करतो,” असेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. देशात ‘चार प्रकारचे हिंदू’ डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजाचे चार वर्गांत वर्गीकरण करत एक महत्त्वाचा सामाजिक आरसा दाखवला. ते म्हणाले, “भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत. पहिला हिंदू हा अभिमानाने आपण हिंदू असल्याचे सांगतो. दुसरा हिंदू हा मी हिंदू आहे तर मग त्यात काय झालं? यात अभिमानाची बाब काय आहे? असे म्हणतो. तिसरा हिंदू हा स्वत:ला हिंदू म्हणून घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही मला घरात विचाराल तरच मी हिंदू असल्याचे सांगेन असं म्हणतो. चौथा हिंदू हा आपण हिंदू असल्याचेच विसरून गेला आहे. किंवा तो हिंदू असल्याचे त्याला विसरून जाण्यास भाग पाडण्यात आले आहे.” भारतातील मुस्लीम आणि ख्रिश्चन हे भारतीयच हिंदू धर्मावर भाष्य करताना सरसंघचालक म्हणाले की, “भारताचा ‘सनातन’ स्वभाव कधीच बदलणार नाही. ऋषी-मुनींनी सांगितल्याप्रमाणे ‘सगळे आपलेच आहेत’ ही संघाची धारणा आहे. आपण विश्वगुरू होणार आहोत. भारतातील मुस्लीम आणि ख्रिश्चन हे भारतीयच आहेत. आपल्याला कोणालाही मागे सोडायचे नाही, तर सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. एकट्याला राहायचे असेल तर कोणत्याही नियमांची गरज नसते. जेव्हापासून सृष्टी आहे तेव्हापासून धर्म आहे.”

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर