ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

वर्षातील सर्वात मोठा रविवार आज:13 तास 13 मिनिटांचे असेल दिनमान, जिज्ञासूंनी अनुभवावा दिवस‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी रविवारी (२१ जून) हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, एकूण दिवसकाळ (दिनमान) १३ तास १३ मिनिटांचा असणार आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेचे पदाधिकारी आणि हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी नागरिकांना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे. भारतात म्हणजेच उत्तर गोलार्धात २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या खगोलीय घटनेला ‘समर सॉलस्टाईस’ किंवा उन्हाळी संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीच्या कर्कवृत्तावर थेट वर असतो, ज्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान असते. समर सॉलस्टाईस ही एक खगोलीय घटना आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतील पृथ्वीचे सूर्यासमोरचे स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. २१ जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते, ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. जगातल्या अनेक देशांमध्ये २१ जून रोजी दिवस हा १२ तासांपेक्षाही मोठा असतो, असे गिरुळकर आणि गुल्हाने यांचे म्हणणे आहे. दरम्यान सर्व खगोलप्रेमी, विद्यार्थी आणि जिज्ञासूंनी या १३ तास १३ मिनिटांच्या दिवसकाळाचे प्रत्यक्ष कालमापन करावे आणि या खगोलीय चमत्काराचा अनुभव घ्यावा, असे आवाहनही मराठी विज्ञान परिषदेने केले आहे. या घटनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास नागरिकांनी ९५६३७४८४१२ किंवा ९४२२८६८८१२ वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. पृथ्वीचा अक्ष आणि सूर्याचे स्थान खगोलशास्त्रीय रचनेनुसार, पृथ्वी आपल्या अक्षावर २३.५ कोनाने कललेली आहे. २१ जून रोजी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त झुकलेला असतो. त्यामुळे सूर्य या दिवशी उत्तर गोलार्धात ‘कर्कवृत्तावर’ अगदी डोक्यावर येतो. या स्थितीला ‘उन्हाळा संपात दिन’ असेही म्हटले जाते. या दिवशी वर्षातील सर्वात मोठी रोजनिशी (दिवस) आणि सर्वात लहान रात्र अनुभवता येते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर