ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जामगव्हाण तांडा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा:३ दुचाकी, ४ मोबाईलसह ३.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कामगिरी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत जामगव्हाण तांडा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झन्नामन्ना जुगार अड्डयावर छापा टाकून ३ दुचाकी, ४ मोबाईलसह ३.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सात जणांवर शुक्रवारी ता. २ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोलीचे पोलिस अधीक्षक निलभ रोहन यांनी जिल्हाभरात अवैध व्यवसायावर छापे टाकण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. स्थानिक पोलिस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील कार्यरत ठेवण्यात आले आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांची माहिती घेऊन छापे टाकण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्‍वर गोरे, आकाश टापरे, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत जामगव्हाणतांडा शिवारात जुगार अड्डयावर छापा टाकला. साध्या वेशात छापा टाकण्यासाठी गेलेले पोलिसांचे पथक जुगाऱ्यांच्या लक्षात आलेच नाही. यावेळी त्या ठिकाणी सात जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी धरपकड सुरु करताच एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला तर सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून ३१ हजार रुपये रोख, तीन दुचाकी व चार मोबाईल असा ३.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शेख अन्सार (रा. वारंगा), अनिल चव्हाण (रा. जामगव्हाण), राजू राठोड, अर्जुन शिंदे (रा. भाटेगाव), दादाराव नादरे (रा. गिरगाव), बाळू पानपट्टे (रा.कुर्तडी) व अन्य एका विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर