ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शेतीला 7 तास वीज द्या, अन्यथा उपकेंद्र बंद‎:पंढरपुरात लोडशेडिंग विरोधात महावितरणवर मोर्चा; आमदारअभिजित पाटलांचा इशारा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संध्याकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश असल्याचे अधिकारी सांगतात. मग उर्वरित १४ तासांमध्ये योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना किमान ७ तास नियमित वीजपुरवठा का केला जात नाही? आमची कोणतीही मागणी नियमांच्या चौकटी बाहेरची नाही. पण नियमानुसार जेवढा वीजपुरवठा देणे अपेक्षित आहे, तो तरी सुरळीत आणि सातत्याने दिला पाहिजे, अन्यथा बुधवारी तालुक्यातील वीज उपकेंद्र बंद करू, असा इशारा आमदार अभिजित पाटील यांनी दिला. तसेच येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न विधानभवनात आक्रमकपणे लावून धरू,” अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. या आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे अध्यक्ष नागेश फाटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, बाळासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संतोष बागल, भारत कोरके यांच्यासह मान्यवरांची तहसील कार्यालयासमोर भाषणे झाली. उन्हाची पर्वा न करता शेतकरी मोर्चात तालुक्यातील महावितरणच्या मनमानी लोडशेडिंग विरोधात आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी | अक्कलकोट पावसाने ओढ दिल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पाणीसाठा आणि पाणी वापराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर बोरी मध्यम प्रकल्प तसेच पाटबंधारे तलावावरील कृषिपंपांचा विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी होणारा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी आणि पाणीसाठ्याचे नियोजन सुरळीत ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सुरुवातीला आवश्यक सेवेसाठी पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याबाबत २ तास सुरू असलेला विद्युत संबंधित महसूल यंत्रणेशी झालेल्या सूचना देण्यात आल्या. पाऊस नसल्याने शेतकरी हैराण नव्याने महावितरणचा झटका यावेळी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, “एकीकडे पाऊस नसल्यामुळे निसर्गाने शेतकऱ्यांवर घाला घातला आहे, तर दुसरीकडे विजेअभावी शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. सध्या शेतात ऊस, द्राक्षे, डाळिंब, केळी यासारखी नगदी पिके उभी आहेत. मात्र, वेळेवर पाणी मिळत नसल्याने ही पिके करपू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी अजूनही या संकटातून सावरलेला नाही. साधारण सातशे वीजपंप पडले बंद कुरनूर धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट निर्माण झाले आहे. कुरनूर धरणाच्या बॅकवॉटर वर जवळपास ७०० पेक्षा जास्त विद्युत मोटारी सुरू आहेत. यासोबतच धरणातील पाणी पितापूर, हन्नूर, बावकरवाडी परिसर, कुरनूर, चुंगी या गाव शिवारापर्यंत अजूनही असल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळत होता. परंतु आता वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. पुढील आदेश मिळेपर्यंत शेतीसाठी वीजपुरवठा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर