ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बोगस उडीद बियाणे घोटाळ्यातील आरोपी आठवड्यानंतरही गायबच:” कृषी”च्या भूमिकेबद्दलही संशय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एका नामांकित कंपनीच्या ब्रॅण्डचा गैरवापर करून बोगस उडीद बियाणे बाजारात विक्रीसाठी आणून शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल, फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी रत्नाकर रघुनाथ कोले यास अटक करण्यात बार्शी शहर पोलीसांना अपयश आले आहे. घटनेला १० दिवस उलटले तरी पोलीसांना अदयाप त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही हे विशेष. खरीप हंगाम जवळ आला की शेतकरी हंगामाच्या तयारीला लागलेला असतो. ‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे म्हटले जाते. अलिकडील काळात शेतकरी आधुनिकतेकडे वळला आहे. चांगले उत्पादन मिळावे यासाठी बी-बियाणे खरेदी करताना अधिकची किंमत मोजावी लागली तरी कृषी विदयापीठांनी विकसीत केलेले, उगवणक्षमता तपासलेले, बीजप्रक्रिया केलेले व नामांकित कंपन्यांनी बाजारात आणलेले वाण घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. अगदी घरातील दागिने गहाण टाकून, उधार-उसनवारी करून तो हंगामाची तयारी करतो कारण त्यावर त्याचे वर्षभरातचे आर्थिक गणित अवलंबून असते. परंतु, याच काळात नामांकित कंपन्यांच्या वाणांची हुबेहुब नक्कल करून शेतकऱ्यांची फसवणूक करून आपल्या काळया कृत्यांनी घरे भरणारे भामटे टपून असतात. बार्शी शहर व अक्कलकोट शहरात नुकताच अशा काळ्या कृत्याचा भांडाफोड झाला. शासनाने बियाणे विक्री केंद्र तपासणी, बियाणे नमुने काढणे, तपासणीसाठी पाठविणे, विक्री बंद आदेश देणे यासाठी बियाणे निरीक्षक नेमले आहेत. बार्शी शहर व तालुक्यात आलेल्या बोगस बियाण्यांची खबर कृषी विभागाला अगोदर लागायला हवी होती. परंतु, तक्रार आल्यानंतर कृषी विभाग कारवाईसाठी सरसावला व बोगस बियाणे जप्त करून रत्नाकर कोलेवर गुन्हा दाखल केला. अक्कलकोट मध्येही कृषी विभागाने शहरातील संत हरळय्या शॉपींग सेंटर कांदा बझार येथील आबा कृषी सेवा केंद्राची तपासणी करून सुमारे ८ लाख ४६ हजार रूपये किंमतीचे बोगस उडीद बियाणे जप्त केले. या दुकानचा तुकाराम मोरे याने रत्नाकर कोले, स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगांव याचेकडून हे बियाणे खरेदी केले होते. याप्रकरणी तुकाराम मोरे व रत्नाकर कोले याच्यावर गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी रत्नाकर कोले याचे कृत्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणारे, बोगस बियाण्यामुळे उत्पादन व गुणवत्तेवर फरक पडून त्यांच्या एकूण उत्पन्नावर घाला घालून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे असे गंभीर परिणाम करणारे आहे. कोले याला लवकर अटक केले तर त्याने आणखी किती प्रकारचे बोगस बियाणे बनविले आहे? ते कोठे वितरीत केले आहे, याचा हंगाम सुरू होण्याच्या अगोदर छडा लागणे गरजेचे आहे. परंतु, १० दिवस उलटले तरी बार्शी शहर पोलीसांना रत्नाकर कोले याला अटक करण्यात अपयश आले आहे. त्यावरून शहर पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून कृषी विभागाने बार्शी शहरातील कासारवाडी रोड पवार प्लॉट येथील स्वराज्य कॉलनी येथे रत्नाकर कोले याने भाडेतत्वावर घेतलेल्या गाळयातील व विक्री केलेले असे सुमारे साडेसात लाख रूपयांचे बोगस उडीद बियाणे जप्त केले व याप्रकरणी प्रोपायटर रत्नाकर रघुनाथ कोले याच्यावर बार्शी शहरात गुन्हा दाखल केला. तक्रारीनंतरच कृषी विभाग सरसावला अक्कलकोटमधील कारवाई बार्शीतील कारवाईत गुन्हा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर