ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाबासाहेबांना अनोखे अभिवादन:विद्यार्थी करणार सलग 10 तास अभ्यास, सहभागींना प्रमाणपत्रही दिले जाणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मंगळवारी ता. १४ सलग १० तास अभ्यास करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे. या उपक्रमात दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहे. त्याबाबतचे नियोजनही महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मिरवणुक, समाज प्रबोधन कार्यक्रम, अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली शहर निळ्या ध्वजांनी सजले आहे. या शिवाय भव्य आकाराचे निळे ध्वज, रुमाल, टोप्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान, हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाने यावर्षी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी प्रत्यक्ष कृतिशील अभ्यासात्मक अभिवादन करावे या उद्देशाने १० तास अभ्यास करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवारी ता. १४ सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत १० तास अभ्यास केला जाणार आहे. महाविद्यालयातील अभ्यासिकेमध्ये सुमारे २०० विद्यार्थी बसू शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. उपक्रमात सहभागी सर्वांसाठी सकाळी चहा-बिस्कीट, फळे त्यानंतर ज्यूस, नाश्ता व भोजनाची व्यवस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यानी फक्त अभ्यासाची पुस्तके ,साधने सोबत आणणे आवश्‍यक आहे. या उपक्रमात डॉक्टर्स, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. पालकांनी या उपक्रमास भेट देऊन प्रोत्साहन द्यावे – डॉ. चक्रधर मुंगल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यार्थ्यांनी अभ्यासात्मक अभिवादन करून कठोर, दीर्घ अभ्यासाची प्रेरणा घ्यावी यासाठी या अभ्यासाच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. वैद्यकिय महाविद्यालयासह इतर विद्यार्थ्यांनीही याउपक्रमात सहभागी नोंदवावा. तसेच पालकांनी या उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर