ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

आदित्य ठाकरेंनी लायकीत अन् शिस्तीत बोलावे:मी बोललो तर तुम्ही शब्द ऐकू शकणार नाही, शिंदेंवरील टीकेनंतर नीलेश राणे आक्रमक

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ठाकरे गट आणि राणे कुटुंबियांमधील राजकीय कलगीतुरा पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. आमदार नीलेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरेंनी लायकीत आणि शिस्तीत बोलावे, नाही तर आमचा तोल सुटायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी दिला आहे. नीलेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी आमचा तोल जाण्याची वेळ येऊ देऊ नये. आम्ही उद्धव ठाकरे यांना ‘साहेब’ म्हणून आदर देतो आणि तो नेहमीच देत राहणार. पण तुम्हीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला पाहिजे. तुमच्या वडिलांचे सरकार होते आणि ते मुख्यमंत्री होते म्हणून तुम्हाला थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते, तुमचे स्वतःचे असे काही कर्तृत्व नाही. त्यामुळे बोलताना आपल्या वयाचे भान ठेवावे. आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे नीलेश राणे म्हणाले की, जीभ सोडायला आम्हाला वेळ लागत नाही, मी काय बोलू शकतो हे संपूर्ण जगाला माहीत आहे. जर मी तोंड उघडले आणि बोलायला सुरुवात केली, तर तुम्ही ते शब्दही सहन करू शकणार नाही. आम्हाला बोलण्यासाठी कोणतीही बंधने नाहीत, आम्ही काहीही बोलू शकतो. परंतु, एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना नीटनेटक्या भाषेत आणि मर्यादेत बोलले पाहिजे. वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल चुकीचे शब्द वापरताना आदित्य ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
..तर आडनावाचा विचार करणार नाही नीलेश राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून आज उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आदित्य ठाकरेंचे वय काय आणि ते बोलतात काय? ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असते, पण जर एकदा ती मुठ सुटली तर मग समोर कोण कोणत्या आडनावाचा आहे, याचा आम्ही विचार करणार नाही. आता पूर्वीसारखे दिवस राहिले नसून कोण कोणाचे ठाकरे राहिलेत, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी निशाणा साधला. राऊत हे भंगार माणूस याच वेळी नीलेश राणे यांनी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरही नेहमीच्या शैलीत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर बोलताना राणे म्हणाले, संजय राऊत हे पूर्णपणे भंगार माणूस आहेत. ते कधीच चांगली आणि सुसंस्कृत भाषा बोलू शकत नाहीत. केवळ शिवीगाळ करणे आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलणे एवढीच त्यांची भाषा आहे, अशा शब्दांत राणेंनी राऊत यांच्या टीकेचा कचरा केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर