ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन, 3 दिवसांनी विलास घुलेंवर अंत्यसंस्कार:केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन, खासदारपुत्रावर गुन्ह्याची मागणी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणामुळे सलग तीन दिवस केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास थेट केज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून ठिय्या मांडला. अखेर मध्यरात्री खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर आणि पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर, तब्बल 53 तासांनंतर (3 दिवसांनी) रात्री उशिरा विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. 53 तास आंदोलन, केज शहर कडकडीत बंद विलास घुले यांच्या हत्येनंतर मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही केज शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.सकाळी 11 वाजल्यापासून अंबाजोगाई – केज – मांजरसुंबा या राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात उशिरापर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड मार्गे केजकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस नेकनूर पोलीस ठाण्यातच थांबवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आंदोलनादरम्यान एक रुग्णवाहिका रुग्ण नसतानाही वारंवार चकरा मारत असल्याने संतप्त जमावाने तिला अडवले आणि बुक्क्या मारून तिच्या काचा फोडल्या. पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न आणि अधिकाऱ्याला विरोध मंगळवारी दुपारी २ वाजता संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी विलास घुले यांचा मृतदेह थेट केज पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला. सुमारे ४ हजारांहून अधिक जमाव आक्रमक झाला होता. पोलिसांनी मुख्य गेट लावून जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाने “पोलीस निरीक्षक उनवणेंना हाकलून लावा” अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. उनवणे सरकारी जीपने बाहेर जात असताना जमाव त्यांच्या अंगावर धावून गेला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) मिश्रा यांनी बीडमध्ये तळ ठोकला, तर पोलीस अधीक्षक (SP) नवनीत काँवत यांनी केज ठाणे गाठले. मृताच्या भावाची मागणी: खासदारपुत्रावर गुन्हा दाखल करा मृताचा भाऊ रमेश घुले यांनी पोलिसांसमोर स्पष्ट मागणी ठेवली की: “आरोपीला मदत केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा. तसेच, उमेश माने यांची फिर्याद घेऊन सौरव सोनवणेसह सर्व आरोपींवर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी.” खासदार बजरंग सोनवणे यांचे स्पष्टीकरण नातेवाईकांच्या या मागणीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले की, “घुले कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. या प्रकरणात माझ्या मुलाचा अगदी दूरपर्यंत कोणताही संबंध नाही. पण कुणीही असो, अगदी मीसुद्धा दोषी असलो, तरी खुशाल गुन्हा दाखल करावा.” विधानसभेत पडसाद: “हत्येचा कट पूर्वनियोजित” या प्रकरणाचे तीव्र पडसाद मंगळवारी विधानसभेतही उमटले. परळीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात आरोप केला की, “भांडण सोडवताना झालेली ही हत्या नसून तो एक पूर्वनियोजित कट होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा पोलिसांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.” मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन आणि आंदोलनाची सांगता आंदोलनाची वाढती तीव्रता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. हाके यांनी आंदोलकांच्या भावना आणि खासदारपुत्रावर गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर आणि आश्वासनानंतर, पोलिसांनी रात्री उशिरा रमेश घुले यांचा ‘पुरवणी जबाब’ नोंदवून घेतला. “या जबाबातील माहितीची पडताळणी करून हत्या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई होईल,” असे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले. या लेखी आश्वासनानंतर अखेर ५३ तासांनंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि रात्री उशिरा टाकळी शिवारात विलास घुले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अंत्यसंस्कार पार पडले असले, तरी आता नोंदवलेल्या पुरवणी जबाबानुसार पोलीस खासदारपुत्र सौरव सोनवणे याच्यावर खरंच गुन्हा दाखल करणार का? आणि या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ कोण आहे? याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर