ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रामशास्त्री प्रभुणेंच्या पुण्याला फडणवीसांनी ‘तालिबान’ केलं:आयुष विभागच आजारी! बुलडाण्यातील 70 रुग्णालय व्हेंटिलेटरवर- हर्षवर्धन सपकाळ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ज्या पुणे शहरामध्ये रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारखे लोकं होऊन गेले त्या पुण्याला भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी तालिबान केले आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरील हल्लाचा निषेध करताना त्यांनी आम्ही कुठल्याही पद्धतीने घाबरणार नाही. पवार हे बहुजनांचा, शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा आवाज आहेत, ते प्रभावीपणे काँग्रेसचा आवाज मांडत असतात, त्यांना घाबरून शांत करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. आयुष विभागाला फक्त आरंभशूर असे म्हटले पाहिजे कारण बुलडाणा जिल्ह्यामध्ये 70 रुग्णालय आहेत जे सुरू झाले इमारती सुद्धा पूर्ण झाल्या. पण ही 70 रुग्णालयच कुठेतरी आजारी आहे, त्यांना पुरेसा निधी नाही, कर्मचारी नाही, औषध नाही त्यामुळे हे बंद पडलेल्या अवस्थेत आहेत, जी अवस्था बुलडाणा जिल्ह्याची आहे तीच अवस्था संपूर्ण महाराष्ट्राची आहे. त्यामुळे उद्या राष्ट्रपती येत असताना या सुरू झालेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. केस अन् नख गळती हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रपती ज्या तालुक्यामध्ये येत आहे त्या तालुक्यामध्ये केस गळण्याचे आणि नखे गळण्याचे प्रकार रेशनचे दुषित अन्न खाल्याने झाले. हे सरकारच्या माध्यमातून खाऊ घालण्यात आलेले रेशन आहे. एक वर्ष झाले पण हे केस गळती, नख गळती कशी होती याचे कारण समोर आले नाही. त्यासाठी अनेक पथके येऊन गेले पण काहीही हाती आलेले नाही. दुषित अन्नाचे मोठे रॅकेट हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, दुषित अन्नाच्या माध्यमातून एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. त्यांच्या दबावापोटी हा सर्व अहवाल दाबण्यात आला. टक्कल व्हायरस म्हणून जो पुढे आला त्याने प्रशासनाचे टक्कल उघड पडल्यावरही आयुष विभागाने काहीही न करणे हे दुर्दैव आहे.राष्ट्रपतींच्या येण्याने हे 70 रुग्णालय कुठे तरी सुरू राहतील. केस गळती प्रकरणातील आरोपीवर कारवाई होईल.ते अन्न देशभरात कुठेही पोहचणार नाही. सोबतच कुपोषणाचा मोठा मुद्दा महाराष्ट्रात भेडसावत आहे, अशा वेळी प्रशासनाने त्यावर आंधळे बनून पडदा टाकण्याचे काम केले आहे. घोषणा पूर्ण व्हाव्यात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कुपोषणाचा मुद्दा, शाळेबाहेरील विद्यार्थी या गोष्टीवर राष्ट्रपती उद्या निर्देश देतील, अशी अपेक्षा आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट हे महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यामुळे गावोगावी पाणीटंचाई निर्माण होणं सुरू झाले आहे. यात मोठ्या प्रमाणावर लूट झालेली आहे.लुट करणाऱ्यावर कारवाई व्हावीच व्हीवी. केवळ घोषणा न होत्या योजना पूर्ण व्हाव्या ही अपेक्षा आहे. पवारांवर झालेला हल्ला माध्यमांवरही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एका माध्यमाच्या स्टुडिओ बाहेर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला होतो हा माध्यमांवरीलदेखील हल्ला आहे. हे आरोपी भीमा कोरेगाव येथील आरोपी आहे हा त्यांचा इतिहास आहे.अशा दंगलीखोर माणसांना भाजचे किती मोठ्या प्रमाणावर पाठबळ आहे, हे पवारांवरील हल्ल्यातून दिसून येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर