ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

ढगाळ वातावरण पण पाऊस गायब; खरिप हंगाम लांबणार:अल्प-मुदतीच्या तूर, उडीद, मूग पिकाला बसणार फटका‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जून महिन्याचा अर्धा कालावधी संपत आला तरी, अकोट तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात अद्याप समाधा नकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दरवर्षी या काळात शेतात पेरण्यांची लगबग पाहायला मिळते; मात्र यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम चांगलाच लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या या मोठ्या विलंबाने कोरडवाहू शेतकरी तर चिंतेत आहेतच, पण भूगर्भातील जलपातळी कमालीची घटण्याच्या भीतीने बागायतदार शेतकरीही पुरते धास्तावले आहेत. अल्प-मु दतीच्या पिकांना मोठा फटका बसणार तालुक्यात तूर, उडीद आणि मूग यासारखी अल्पमुदतीची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ही पिके साधारणपणे दसरा-दि ाळीच्या सुमारास हाती येतात. हा शेतीमाल बाजारात विकून कोरडवाहू शेतकरी आपले सण-उत्सव साजरे करतो. मात्र, जूनअखेर उजाडला तरी अद्याप पेरण्याच न झाल्यामुळे पिकांच्या संपूर्ण वेळापत्रकावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहे. यामुळे उत्पादनात घट होईल. अकोट, तेल्हारा, हिवरखेडसह परिसरातील खाऱ्या पाण्याच्या अनेक गावांची तहान भागवणारे वान नदीवरील ‘हनुमान सागर धरण’ यंदा पावसाअभावी तळ गाठला आहे. ग्रामीण भागातील विहिरींचीपाणी पातळी खालावल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. ठोस मार्गदर्शन करावे ^पूर्वी उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तिन्ही ऋतू वेळेवर फिरायचे. आता ऋतूचक्रच बदलले आहे. याचा थेट फटका पिकांच्या उत्पन्नावर होत आहे. बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. – रामचंद्र बरेठिया, शेतकरी. वान धरणाची जलपातळी खालावली; पाण्याचे संकट

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर