ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचे सरकारचे कारस्थान:एससी उपवर्गीकरणाविरुद्ध राज्यव्यापी लाँग मार्च; 15 ला शहरात सभा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करून त्यांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचे षडयंत्र राबवत आहे. मूळ प्रश्‍नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जाती-जातींमध्ये संघर्ष लावला जात आहे, असा आरोप अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचे अभ्यासक डॉ. सिद्धार्थ शिनगारे यांनी केला. अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी १० जूनपासून बीड येथून निघणारा राज्यव्यापी लाँग मार्च १५ जून रोजी अहिल्यानगर शहरात येत आहे. या मार्चच्या नियोजनार्थ फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक विजय भांबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, या वेळी डॉ. शिनगारे बोलत होते. या वेळी एन. एम. पवळे, पी. पी. खंडागळे, निवृत्ती आरु, सुहास धीवर यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. शिनगारे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानंतर केवळ अडीच महिन्यांत आनंद बदर आयोगाने शासनाला अहवाल सादर केला. मात्र, या एक सदस्यीय आयोगाने राज्यभर दौरे न करता, व्यापक चर्चा न करता हा अहवाल कसा तयार केला? हा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा. घटनेच्या कलम ३४१ नुसार आरक्षणाचे अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला असताना, राज्य सरकार उपवर्गीकरणाची प्रक्रिया राबवून अन्याय करत आहे. एससी मधील ५८ जाती या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर